Dilip Wagh & Amol Shinde esakal
जळगाव

Jalgaon Vidhan Sabha Election: पाचोऱ्यात महायुतीला दुसरा ‘दे धक्का...’! दिलीप वाघांपाठोपाठ अमोल शिंदेंनी थोपटले उमेदवारीचे दंड

Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलिप वाघ यांच्यापाठोपाठ आता अमोल शिंदेंनीही उमेदवारीसाठी दंड थोपटल्याने महायुतीला एक धक्का मानला जात आहे.

प्रा. सी. एन. चौधरी

पाचोरा : विधानसभा निवडणुकीची तयारी शासकीय स्तरावर सुरू असली तरी अजून निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी पाचोरा विधानसभा मतदारसंघात प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून निवडणूक तयारीला व प्रचाराला वेग आला असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलिप वाघ यांच्यापाठोपाठ आता अमोल शिंदेंनीही उमेदवारीसाठी दंड थोपटल्याने महायुतीला एक धक्का मानला जात आहे. (Jalgaon Vidhan Sabha Election 2024 Mahayuti second shock in Pachora)

दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे, आप, वंचित आघाडी या पक्षांच्या इच्छुकांनी आपापल्या परीने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू केली आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघत आहे, असे असताना राज्यात असलेल्या महायुतीला पाचोऱ्यात मात्र दुसरा ‘दे धक्का’ भाजपचे अमोल शिंदे यांनी दिला आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार किशोर पाटील, माजी आमदार राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ व भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार अमोल शिंदे यांच्यात चुरशीची लढत झाली होती. अमोल शिंदे यांनी प्रचंड मुसंडी मारत शेवटच्या फेरीपर्यंत आघाडी घेतली होती.

परंतु पाचोरा शहराच्या अखेरच्या फेरीत आमदार किशोर पाटील यांनी अमोल शिंदे यांची आघाडी मोडून काढत सुमारे दोन हजार मतांनी निसटता विजय मिळवला होता. त्यानंतरच्या काळात अनेक राजकीय घडामोडी झाल्या. शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली, त्यातून भाजपने आपला प्रभाव वाढवून घेतला.

येत्या विधानसभा निवडणुकीत कमालीची चुरस होण्याचे चित्र मतदारसंघात गडद होताना दिसत आहे. राज्यात महायुती व आघाडी असली तरी पाचोऱ्यात मात्र महायुतीला धक्का बसण्याचे चित्र सुस्पष्ट झाले आहे. (latest marathi news)

२०२४ च्या निवडणुकीत आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, अमोल शिंदे, उबाठा पक्षाच्या वैशाली सूर्यवंशी या चौघा दिग्गजांसह काँग्रेस, मनसे, वंचित आघाडी, आप या पक्षांच्या इच्छुकांकडून तयारी सुरू करण्यात आल्याने चौरंगी-पंचरंगी लढत अटळ मानली जात आहे. दिलीप वाघ व अमोल शिंदे यांची उमेदवारी महायुतीसाठी डोकेदुखी ठरणार असून, वरिष्ठ नेते त्यातून कसा मार्ग व तोडगा काढतात, या संदर्भातील चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.

तिकीट नाही, तर अपक्ष लढणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ सध्या अजित पवार गटात असून, त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागू उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष उमेदवारी करू, असे या अगोदरच जाहीर करून आपल्या तयारीला गती दिली आहे. दुसरीकडे भाजपचे तालुकाध्यक्ष तथा विधानसभा निवडणूकप्रमुख अमोल शिंदे यांनीदेखील पाचोरा मतदारसंघाची जागा कदाचित भाजपला सुटेल, तशी मागणी व प्रयत्न सुरू असल्याचे सांगून काही अडचण आल्यास अपक्ष उमेदवारी करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दिलीप वाघ यांच्यापाठोपाठ भाजपच्या अमोल शिंदे यांनी महायुतीला दुसरा ‘दे धक्का’ देऊन उमेदवारीसाठी दंड थोपटले आहे. त्यामुळे राजकीय गोटातील चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra CM : महाराष्ट्रात बिहार पॅटर्न का लागू होऊ शकत नाही? ही आहेत ५ मोठी कारणे

Trending : 'असाच' मुलगा हवा! तरूणीने लग्नासाठी दिली जाहीरात; अजब अटीने उडाली सोशल मिडियावर खळबळ

Swanand Kirkire: कविता किंवा चाल सुचण्याची प्रक्रिया कशी असते? स्वानंद किरकिरेंची स्वास्थ्यमसाठी खास मुलाखत

Mumbai Indians Playing XI: मुंबई इंडियन्सने २३ जणांसाठी १०० कोटी खर्च केले, पण Rohit Sharma चा ओपनिंग पार्टनर कोण?

Share Market Closing: शेअर बाजार घसरणीसह बंद; अदानी समूहाच्या शेअर्स कोसळले

SCROLL FOR NEXT