Commuters wading through rainwater that has accumulated in the bus station premises. esakal
जळगाव

Jalgaon News : भुसावळ बसस्थानकात साचला ‘तलाव’! प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळ, रेल्वेच्या वादात कामे रखडली

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : शहरातील बसस्थानक हे ब्रिटिश काळापासून कार्यरत आहे. बसस्थानक हस्तांतरणाच्या मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडून प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. परंतु अद्यापपर्यंत कुठलीही परवानगी रेल्वे बोर्डाने दिलेली नसल्याने गेल्या २५ वर्षांपासून बसस्थानकांत कुठलीही सुधारणा झालेली नाही. त्यात ऐन पावसाळ्यात बस स्थानकात पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असून, प्रवाशांचे हाल होत आहे. (Jalgaon Pond accumulated in Bhusawal bus station)

रेल्वे प्रशासन व महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ यांच्यामध्ये ९९ वर्षांचा करार असल्याने कित्येक वर्षांपासून बसस्थानकाची विकासकामे रखडली आहेत. दोन महिन्यापूर्वीच मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक इति पाण्डेय यांच्या दालनात बसस्थानक रेल्वेकडे हस्तांतरीत करण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींची बैठकही घेण्यात आली. मात्र अद्यापपर्यंत कुठलाही मार्ग काढण्यात आलेला नाही. याबाबत लवकरच निर्णयाची प्रतीक्षा आहे.

प्रवाशांचे हाल

भुसावळ आगारातून महाराष्ट्रभर कुठेही प्रवासी सहजपणे प्रवास करण्यासाठी बससेवा उपलब्ध आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रवाशांकडून तिकिटांच्या माध्यमातून राज्य परिवहन मडळांकडे पैसे जमा होत आहे. मात्र प्रवाशांना सुविधा पुरविण्यात राज्य परिवहन मंडळ बस स्थानकातील खड्डे बुजविण्यासाठी साधा मुरूमही टाकण्यास दुर्लक्ष करीत आहे. रेल्वे प्रशासन व राज्य परिवहन मंडळ या दोघांच्या भांडणात मात्र प्रवाशांचे हाल होत आहे. (latest marathi news)

महिला, जेष्ठांची गर्दी

महाराष्ट्र राज्य शासनाने बसने प्रवास करणाऱ्या महिलांना अर्धे तिकीट काढून प्रवास करण्याची घोषणा केल्यापासून महिला व ज्येष्ठ नागरिकांची बसने प्रवास करण्याची मुभा मिळाल्याने बसस्थानकात मोठ्या प्रमाणात झुंबड असते. बसस्थानकात सर्वत्र पाणी साचल्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांना पाण्यातून व चिखलातून बसमध्ये चढावे लागत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT