Jalgaon News : तापी नदीवरील अमळनेर तालुक्यातील महत्त्वाकांक्षी निम्न तापी प्रकल्पास (पाडळसरे) केंद्रीय जल आयोगाच्या मान्यतेनंतर आता नुकतीच वन व पर्यावरण विभागाची अंतिम मान्यता मिळाल्याने हा प्रकल्प पंतप्रधान सिंचन योजनेंतर्गत समाविष्ट होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी २ हजार ८८८ कोटींचा प्रस्ताव जलशक्ती मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे. आता प्रकल्पाच्या टप्पा-१साठी आवश्यक त्या सर्व तांत्रिक मान्यता प्राप्त झाल्या आहेत. (Proposal of 3 thousand crore submitted to Ministry of Water Power Padalsare project)
जानेवारी २०२४ मध्ये एकूण प्रकल्पास ४ हजार ८९० कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यानुसार सद्यस्थितीत टप्पा-१ अंतर्गत मुख्य धरणाचे काम पूर्ण करायचे असून, १०.४ टीएमसी एवढ्या पाणी वापरासाठी भूसंपादन व पुनर्वसन करावयाचे आहे. जानेवारी २०२४ मध्ये मंजूर प्रशासकीय मान्यतेनुसार, पहिल्यांदाच प्रकल्पाच्या संपूर्ण २५ हजार ६५७ हेक्टर लाभक्षेत्रावर उपसा सिंचन योजना शासनामार्फत करावयास मान्यता मिळाली आहे.
पहिला टप्पा ३ हजार कोटींचा
केंद्र शासनाकडून धरणास निधी उपलब्ध होण्यासाठी प्रकल्पाच्या अद्ययावत किमतीस नवी दिल्लीच्या केंद्रीय जल आयोगाची मान्यता आवश्यक होती. त्या अनुषंगाने मार्च २०२४ मध्ये प्रकल्पाच्या टप्पा-१साठी राज्य शासनाने वित्तीय सहमती दिली असून, २ हजार ८८८ कोटी एवढ्या टप्पा-१ च्या किमतीस केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळाझाली आहे. एप्रिल २०२४मध्ये प्रकल्पाच्या टप्पा- १ साठी जलशक्ती मंत्रालयाकडून २ हजार ८८८ कोटीस गुंतवणूक मान्यता (Investment Clearance) मिळाली आहे. (latest marathi news)
वन विभागाचीही मान्यता
प्रकल्पास आवश्यक वन जमिनीसाठी केंद्र शासनाच्या वन व पर्यावरण मंत्रालयाची अंतिम मान्यता (Forest Clearance)देखील नुकतीच २९ जुलैस मिळाली आहे. प्रकल्पास आवश्यक सर्व वैधानिक मान्यता मिळाल्या आहेत.
प्रस्ताव जलशक्ती मंत्रालयाकडे
आता निम्न तापी प्रकल्प (टप्पा-१) ला केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करण्यासाठी, राज्य शासनाकडून २ हजार ८८८ कोटी एवढ्या किंमतीचा प्रस्ताव जलशक्ती मंत्रालय, भारत सरकारकडे सादर केला आहे. या मान्यतेची पुढील कार्यवाही जलशक्ती मंत्रालयात प्रगतीत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.