underground sewer (file photo) esakal
जळगाव

Jalgaon News : भुसावळ शहरात भूमिगत गटारींसाठी 390 कोटींचा प्रस्ताव नगरविकास मंत्रालयाकडे सादर

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील सांडपाणी वाहून नेणारे नाले भूमिगत करण्यासाठी अमृत अभियानांतर्गत ३९० कोटी १५ लाख ९६ हजार ३४७ रुपयांच्या निधीचा प्रस्ताव नाशिक जीवन प्राधिकरण विभागाकडून नगरविकास मंत्रालयाकडे मान्यतेसाठी रवाना करण्यात आला असून, लवकरच निधीसह मान्यता मिळणार आहे. यासाठी आमदार संजय सावकारे प्रयत्नशील आहेत. भुसावळ शहरातील सांडपाणी हे उघड्या नाल्यांद्वारे वाहून नेले जात आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. (390 crores for underground sewer in Bhusawal city submitted to Ministry of Urban Development )

परिणामी डास उत्पतीसदृश परिस्थिती निर्माण होत असल्याने आमदार सावकारे यांच्या पाठपुराव्याने नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात भूमिगत गटार योजना साकारली जाणार आहे. योजनेसाठी ३९० कोटी १५ लाख ९६ हजार३४७ रुपयांचा निधी अपेक्षित आहे. मात्र, नाशिक जीवन प्राधिकरण विभागाने हा प्रस्ताव अटीशर्तीसह आमदार सावकारे यांच्या पाठपुराव्याने नगरविकास मंत्रालयात मान्यतेसाठी रवाना केला असून, लवकरच शहरात सांडपाणी वाहून नेणारे भूमिगत मार्ग अस्तित्वात येतील.

त्यामुळे डासांची उत्पत्ती व दुर्गंधीपासून शहरवासीयांची सुटका होणार आहे. शहरातील सांडपाणी एका ठिकाणी जमा करून त्यावर प्रक्रिया करून हे पाणी बगीचा, शेती व उद्योगासाठी दिले जाणार आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे. या प्रकल्पाची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे राहणार आहे. यामुळे शहरातील गंभीर समस्या निकाली निघाणार असल्या तरी नगरपालिकेला जीवन प्राधिकरण विभागाने दिलेल्या काही त्रुटी पूर्ण करणे अपेक्षित आहे.

‘अमृत’च्या दुसऱ्या टप्प्याला मान्यता

भुसावळमधील अमृत योजनेसंदर्भात मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत शहरासाठी मंजूर असलेल्या अमृत योजनेची चर्चा झाली. या बैठकीत तांत्रिक समितीने योजनेच्या टप्पा दोनला १३६ कोटी ७७ लाख रूपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. आता रखडलेल्या योजनेला गती मिळणार आहे. अमृत योजना टप्पा दोनच्या संदर्भात १६ जुलैला मुंबईतील मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत राज्यस्तरीय तांत्रिक समितीने भुसावळातील योजनेबाबत चर्चा केली. यावेळी अमृतच्या टप्प्या दोनच्या १३६ कोटी ७७ रुपयांच्या प्रस्तावाला राज्य शासनाने तांत्रिक समितीने मंजुरी दिली आहे. (latest marathi news)

शहरात योजनेंतर्गंत अशी होणार कामे

वाढीव जलवाहिनीसह इतर कामे होणार आहेत. शेळगाव बॅरेजमधील जॅकवेल उभारणी, जलशुद्धकरण केंद्र उभारणी, जॅकवेलपासून जलशुद्धकरण केंद्रापर्यंत १० किलोमीटर अंतराची ८०० मीमी व्यासाची जलवाहिनी, १५० किलोमीटरची वाढीव जलवाहिनी, पंचशील नगरातील १२ लाख लीटरचा एक जलकुंभ आदी कामे होतील.

दरम्यान, अमृत योजनेच्या टप्पा एकची कामे अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे जलकुंभाची शंभर टक्के कामे पूर्ण होतील. नगरपरिषदेचा पाणीपुरवठा प्रकल्प राज्यस्तरीय तांत्रिक समितीसमोर सादर करण्यात आला होता. सदर प्रकल्पाच्या तांत्रिक मान्यतेचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या शिखर समितीने मान्यता दिलेल्या रकमेपेक्षा कमी आहे.

‘‘अमृत योजनेत अनेक किचकट प्रक्रिया असून, निरंतर पाठपुरावा केल्यानंतर मंजुरी मिळाली आहे. शहरातील पाणीप्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे. राज्य शासनाकडून अमृत टप्पा दोनच्या प्रस्तावाला यापूर्वी तांत्रिक व शिखर समितीची मंजुरी मिळाली आहे. आता राज्यस्तरीय समितीची प्रशासकीय मंजुरी मिळाल्याने पुढील प्रक्रियेसह कामांना लवकरच सुरवात होईल.’’-संजय सावकारे, आमदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT