Dhananjaya Koli esakal
जळगाव

Jalgaon PSI Success Story : आईच्या कष्टाचे चीज करीत धनंजय कोळी झाला फौजदार!

PSI Success Story : ‘एमपीएससी’च्या परीक्षेत ४४०पैकी ३०१.५० गुण मिळवून पोलिस उपनिरीक्षकपदाची परीक्षा तो नुकताच उत्तीर्ण झाला.

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : घरात अठराविश्व दारिद्र्य, नववी-दहावीत असतानाच पितृछत्र हरपले, आईने रात्रीचा दिवस करीत मुलाच्या शिक्षणासाठी काबाडकष्ट केले. आईच्या कष्टाचे चीज करीत तालुक्यातील धनंजय राजेंद्र कोळी स्पर्धा परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होऊन आता फौजदार बनला आहे. ‘एमपीएससी’च्या परीक्षेत ४४०पैकी ३०१.५० गुण मिळवून पोलिस उपनिरीक्षकपदाची परीक्षा तो नुकताच उत्तीर्ण झाला. (PSI Success Story Dhananjay Koli became Faujdar)

धनंजयच्या वडिलांचे २०१५मध्ये आकस्मात निधन झाले. त्यांच्या दवाखान्याच्या खर्चामुळे डोक्यावर कर्ज झाले होते. दोन मुलांसह दोन मुलींच्या पालनपोषण व लग्नाची जबाबदारी आईवर येऊन ठेपली होती. एका मुलीचे लग्न झाले होते. आईने रात्रंदिवस कष्ट करून दुसरी मुलगी व मोठ्या मुलाचे लग्न केले.

एक इंचसुद्धा जमीन नसल्याने आईला मजुरीशिवाय पर्याय नव्हता. म्हणून धनंजय व त्याचा मोठा भाऊ कामासाठी सुरतला गेले. अधूनमधून येत अकरावी पूर्ण केली. नंतर परत येऊन १२ वीपर्यंत शिक्षण अमळगावात झाल्यावर आईने धंनजयला अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात शिक्षणासाठी पाठवले.

परिस्थितीची जाणीव असल्याने धनंजयने महाविद्यालयात शिक्षण घेताना 'कमवा शिका योजने'त सहभाग घेतला. खेड्यावरून ये-जा करून महाविद्यालयात राबून मिळेल त्या वेळेत अभ्यास करीत होता. त्याच पैशांवर शिक्षण घेऊन धनंजयने पदवीचे शिक्षण २०२१मध्ये पूर्ण केले. (latest marathi news)

२०२२मध्ये लागलीच एमपीएस्सी परीक्षा जाहीर झाली. धनंजयने पोलिस उपनिरीक्षकपदाची परीक्षा दिली अन्‌ पहिल्याच प्रयत्नात धंनजय उत्तीर्ण झाला. एका गरीब घराण्यातील मुलगा कष्ट करून अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात फौजदार झाल्याने सर्वत्र त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

"आयुष्यात काहीतरी बनायचे आहे, हे स्वप्न उराशी बाळगून अधिकारी होण्याचे ध्येय ठरवले होते. गरिबीचा बाऊ न करता, आईचे कष्ट डोळ्यासमोर ठेवत आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेत हे यश संपादन केले आहे."- धनंजय राजेंद्र कोळी, अमळनेर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT