जळगाव : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रांवर मतदान जनजागृती संदर्भात प्रयत्न केले जात आहेत असे प्रतिपादन अनिकेत पाटील डेप्युटी सीईओ. तथा जिल्हा नोडल अधिकारी यांनी केले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित. (Jalgaon Public awareness to increase voter turnout)
उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांच्या मार्गदर्शनाने येथील अण्णासाहेब डॉ.जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय नोडल अधिकारी सहविचार सभेत ते बोलत होते.
समाजातील सर्वच घटकांना मतदान प्रक्रियेत सामील करून घेऊन नव मतदार तसेच महिला मतदार, दिव्यांग मतदार, पारलिंगी मतदार, संघटित, असंघटित क्षेत्रातील कामगार यांच्यापर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात मतदार जनजागृती मोहीम राबवून त्यांना मतदान करण्यास उद्युक्त करण्याचे आवाहन करण्यात आले.
समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील म्हणाले की, जिल्ह्यात कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रांवर जास्तीत जास्त मतदान होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यावर अधिक भर द्यावा. (latest marathi news)
मोहिमेत सर्वच समाज घटकांचा विविध प्रसिद्धी माध्यमांचा प्रभावी वापर तसेच विद्यापीठाद्वारे नियुक्त करण्यात आलेले कॅम्पस अँबेसॅडर यांच्या सहकार्याने अधिकाधिक समाज घटकांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले.
सहाय्यक जिल्हा स्वीप नोडल अधिकारी डॉ.अतुल इंगळे व प्रा.राहुल वराडे, डॉ.जयेंद्र लेकरूवाळे (संचालक विद्यार्थी कल्याण मंडळ कबचौउमवि जळगाव), डॉ.उमेश गोगाडिया (राज्यशास्त्र विभाग प्रमुख कबचौउमवि जळगाव), डॉ.मिलिंद बागुल (मुख्याध्यापक सार्वजनिक विद्यालय असोदा), मुकुंद गोसावी (दिव्यांग आयकॉन) आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.