Jalgaon Banana Crop : न्हावीसह परिसर केळीचा पट्टा म्हणून ओळखला जातो. या परिसरात मुख्य पीक म्हणून केळी घेतली जाते. त्यामुळे परिसरात शेतकरी केळीची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. मात्र, अनेक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याच्या केळी पिकाला फलक भावानुसार दर मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. (Jalgaon Purchase of bananas at low rates farmers of Yawal taluka expressed their grievances)
आजरोजी फलक भाव १ हजार ९५० असून व्यापारी हजार ते ११०० रुपये क्विंटलला मागणी करीत आहेत. फलक भाव ते खरेदी भाव यामध्ये तब्बल सातशे ते आठशे रुपये दरापर्यंत भावामध्ये तफावत आहे. अशा प्रकारे व्यापारी पिळवणूक करीत असल्याची तक्रार परिसरातील शेतकऱ्यांनी केली. या पिकाला वाढविण्यासाठी बळीराजा दिवस रात्र एक करतो. मात्र कधी वादळी वारा तर कधी अती तापमानाने मोठे नुकसान होते.
लागवडीपासून तर कापणीपर्यंत मशागतीसाठी खतपाणी, मजुरी, निंदणी, किटकनाशके अशा अनेक खर्चासह केळी पिकासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात पीकविमा नुकसान भरपाईसाठी शेतकरी पैसे भरून पीकविमा घेतात. त्यामध्ये सुद्धा आश्वासन देऊनही अद्याप काही शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळाला नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
यासाठी कृषी उत्पन्न व खरेदी-विक्री संघाने तसेच लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांनी लक्ष देऊन केळी भावासाठी प्रयत्न करण्याची गरज असून, शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा परिसरातील शेतकऱ्यांकडून व्यक्ती केली जात आहे. (latest marathi news)
"यावर्षी केळी उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट असूनही भावांत फार मोठी तफावत आहे. फलकावर असलेला भाव व प्रत्यक्ष विक्री यात मोठा फरक असल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. केळीवर ‘सीएमव्ही’, ‘करपा’ रोगांचा प्रादुर्भाव, एकंदरीत उत्पादन खर्च वाढला असून, केळीला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवावी."
- शरद महाजन, अध्यक्ष, जे. टी. महाजन फ्रूट सेल सोसायटी, न्हावी.
"आजही किरकोळ केळी विक्रीचा दर तीस ते साठ रुपये डझन आहे. तरीसुद्धा व्यापारी फलक भावापेक्षा निम्मे भावाने केळी खरेदी करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत असतात. यावर लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन केळी उत्पादक शेतकऱ्याला दिलासा मिळेल, अशी भूमिका घेण्याची गरज आहे. आधीच जास्त तापमान व मध्येच अवकाळी पावसाने, वादळी वाऱ्याने परिसरातील काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे."- देवेंद्र चोपडे, केळी उत्पादक शेतकरी, सरपंच, ग्रामपंचायत न्हावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.