Jalgaon Railway Police : पोलिस कायम टीकेचा धनी असतो. किंबहुना त्यांची प्रतिमाच तशी बनविली गेली आहे. मात्र, यापलीकडे सामान्यांसाठी जिवावर उदार होऊन सामान्यांसाठी धावून जाणारे खरे जिगरबाज वर्दीत कमी नाहीत. असाच जिगरबाज वर्दीतील जवानाचा प्रत्यय गुरुवारी अनुभवायला आला. दोन वर्षीय चिमुरडीला वाचवण्यासाठी फिरेाज तडवी या पोलिसाने रेल्वे अन् फलाटाच्या अंतरात कंबरेपासून आत स्वतःला झोकून देत दोन वर्षाच्या चिमुरडीला वाचविले. (Railway Police saved life of 2 year old girl )
काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा लाखो नेटकऱ्यांनी बहादुरीला सॅल्यूट करीत कौतुक केले. एमआयडीसी पोलिस ठाण्यातील फिरोज तडवी गुरुवारी (ता.२०) पहाटे चारच्या सुमारास शासकीय कामानिमित्त सेवाग्राम एक्स्प्रेसने नाशिकला जाण्यासाठी जळगाव रेल्वेस्थानकावर पोचले.
पहाटेच्या वेळेस प्रवासी झोपेत असताना गाडीत चढण्याच्या धावपळीत एक लेकरू कडेवर दुसरे हातात घेवुन एक मायमाऊली गाडीत चढत असताना तिच्या हातातील दोन वर्षीय चिमुरडी गाडी अन् रेल्वे फलाटाच्या गॅप मध्ये पडली. त्याचवेळी सेवाग्राम एक्सप्रेसला पावने पाचला सिग्नल मिळाला. गाडी वेग धरणार एवढ्या काही सेकंदात खाकी वर्दीतील देवदूतच चिमुरडीला वाचवण्यासाठी अवतरला.
विजेच्या वेगाने घेतली झेप
क्षणाचा विलंब न करता विजेच्या वेगाने फिरोज तडवी यांनी फलाट आणि चाकाच्या गॅपमध्ये स्वतःला कंबरेपासून अर्ध्याहून अधिक झोकून देत चालत्या रेल्वेगाडीच्या चाकापर्यंत स्वतःचे हात पोचवून चाकाखाली येण्यापूर्वीच चिमुरडीला मृत्यूच्या दाढेतून अलगद बाहेर काढले. (latest marathi news)
दैव बलवत्तर म्हणूनच....
घडला प्रकार इतका भीतीदायक होता की, चिमुरडी धावत्या रेल्वेतून खाली पडणे, स्वतःचा जीव जाऊ शकतो याचा विचार न करता फिरोज तडवी यांचे प्रसंगावधान पाहून झेपावणे, रेल्वेत चढणारी त्या चिमुरडीची आई, प्लॅटफॉर्मवर असलेले प्रत्यक्षदर्शी यांच्या काळजाचा अक्षरशः थरकाप उडाला. अनेकांनी किंकाळ्याही मारल्या अन् काहींनी डोळेही बंद करून घेत तोंडावर हात ठेवून घेतले होते. चिमुरडीला सुखरूप बाहेर काढल्यावर अनेकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले.
नेटिजन्सकडून सॅल्यूट
घडल्या प्रकाराने लोहमार्ग पोलिसांनी त्या महिलेस धीर देत दालनात आणले. स्थानकावरील प्रत्यक्षदर्शीनीही टाळ्यांच्या गजरात फिरोज तडवी यांचे कौतुक केलेच, पण सिसीटीव्हीत कैद झालेल्या या थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर फिरेाज तडवी यांना नेटिजन्स कडून लाखो सॅल्यूट मिळत आहेत. पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तडवी यांचे कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.