Railway  esakal
जळगाव

Jalgaon News : रेल्वेचे आरक्षण फुल्ल! बुकिंग कालावधी 120 वरून 60 दिवसांवर; तिकिटांचा काळाबाजार वाढणार

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : मुंबई, पुणे, नागपूरसह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात जाणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्यांचे आरक्षण आताच फुल्ल झाले आहे. सध्या चार महिन्यांपासून प्रवासी ‘वेटिंग’वर आहेत. असे असताना ऐन दिवाळी, पर्यटन हंगामाच्या तोंडावर रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना धक्का दिला आहे. रेल्वे तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल केले आहेत. या नियमानुसार आता १२० दिवस आधी नव्हे तर केवळ ६० आधी रेल्वेचे तिकीट आरक्षण करता येणार आहे. (Railway reservation full booking period will increase from 120 to 60 days )

एक नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. रेल्वेचे आरक्षित तिकीट आताच मिळत नाही. ६० दिवसांमुळे आणखी 'वेटिंग' वाढेल. यातून रेल्वे तिकिटांचा काळाबाजार फोफावणार आहे, अशा प्रतिक्रिया रेल्वे प्रवाशांनी, रेल्वे संघटनांनी दिल्या आहेत. हा निर्णय मागे घेण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.

१२० दिवस कायम राहावे

प्रा. नीलेश चौधरी (प्रवासी) : रेल्वेचे आरक्षण करण्यासाठी १२० ऐवजी ६० दिवसांपर्यंत कालावधी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे रेल्वे तिकिटांचा अधिक काळाबाजार होणार आहे. सर्वसामान्य प्रवाशांच्या सुविधेसाठी हा निर्णय मागे घेतला पाहिजे. रेल्वेचे आरक्षण करण्याचा कालावधी १२० दिवस कायम राहावा. (latest marathi news)

...हा निर्णय चुकीचाच

संजय चौधरी (रेल्वे प्रवासी संघटना) : रेल्वेचे तिकीट १२० दिवस म्हणजे चार महिने आधी बुक करण्याच्या सुविधेमुळे प्रवाशांना प्रवासाचे नियोजन खूप अगोदर करणे शक्य होते. त्यामुळे रेल्वेचे तिकीट आरक्षित करणेही सोयीचे होते. परंतु नव्या निर्णयानुसार ६० दिवसांची कालर्मयादा ठरविण्यात आली आहे. त्यामुळे तिकीट बुकिंगसाठी प्रवाशांची झुंबड उडेल. कारण रेल्वे प्रवासाचे नियोजन हे आगामी ६० दिवसांतच करावे लागेल.

पर्यटन नगरीलाही फटका

प्रमोद झांबरे (संचालक टुरिझम संघटना) : अनेक जण नियोजन करून कुटुंबासह पर्यटनाला जाण्याचे नियोजन करतात. प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य देतात. परंतु रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे पर्यटनाचे नियोजन कोलमडेल. याचा पर्यटननगरीलाही फटका बसेल. रेल्वेला वेटिंग वाढेल. त्यामुळे आरक्षणाचा सध्या असलेला कालावधी कायम राहावा.

नियोजनच करता येणार नाही

प्रतीक्षा भावसार (पर्यटक) : साठ दिवसांनंतर कुठे रेल्वेने जायचे असेल तर नियोजनच करता येणार नाही. रेल्वेचे आरक्षण, हॉटेल आदीचे बुकिंग करता येणार नाही. त्यामुळे प्रवास पुढे ढकलावा लागेल. त्यामुळे कोणताही बदल करता कामा नये. तारखेनुसार नियोजन ज्या तारखेला जायचे असेल, त्यानुसार रेल्वेच्या तिकिटाचे बुकिंगचे नियोजन करावे लागले. प्रवासाची तारीख आणि बुकिंगची ६० दिवस आधीचा कालावधी, हे पाहून प्रवाशांना नियोजन करावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mangesh Kulkarni: वादळवाट, आभाळमाया या प्रसिद्ध मालिकांचे गीतकार लेखक मंगेश कुलकर्णी यांचं निधन

"बियर्डलेस बॉयफ्रेंड की तमन्ना अब हमारे दिल में है"; खोटी दाढी लावून तरुणींची जोरदार घोषणाबाजी, आंदोलनाचा Video Viral

Nana Patole: शिर्डी विधानसभेच्या लोणी गावात 2,844 बोगस मतदार; पटोलेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

VIDEO : "...तर लॉरेन्स बिश्नोई आमचा हिरो!"; जैन मुनींचा वादग्रस्त व्हिडीओ तुफान व्हायरल

Savner Vidhan Sabha: सावनेर यंदा केदारांकडं राहणार की जाणार? कसं आहे सध्याचं समिकरण?

SCROLL FOR NEXT