Jalgaon Rain Crisis : चाळीसगाव तालुक्यातील खरीपाची पिके पावसाअभावी करपून गेली आहेत. विशेषत: कोरडवाहू क्षेत्रातील ४९ हजार १६६ हेक्टर क्षेत्रातील पिके धोक्यात आली आहेत. पाऊस झाला काय न झाला काय या पिकांच्या उत्पन्नात मोठी घट येणार आहे.
जुलै व ऑगस्ट महिन्यात पावसाने खंड दिल्याने खरीप पिकांच्या वाढीवर तसेच येणाऱ्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला असून, बळीराजाचे डोळे आता आकाशाकडे लागले आहेत. (Jalgaon Rain Crisis problematic picture of Chalisgaon taluka)
तालुक्यातील चाळीसगाव, शिरसगाव, तळेगाव महसूल मंडळांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. मात्र कोरडवाहू क्षेत्रातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे.
या पिकांचा देखील सरसकट पंचनामा करण्यात येऊन मदत जाहीर करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, सर्वच मंडळात दुष्काळाचे विदारक चित्र आहे.
चाळीसगाव तालुक्यात खरीप क्षेत्राचे पेरणीयोग्य क्षेत्र ८७ हजार ५०० हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी यंदा ८६ हजार १५३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
त्यातही ४९ हजार १६६ हेक्टर क्षेत्रावर जिरायत अर्थात कोरडवाहू तर ३६ हजार ९८७ हेक्टर क्षेत्रावर बागायत पिकांची पेरणी झाली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सरसकट पंचनामे करा
सर्वाधिक पेरा हा कापूस लागवडीचा आहे. त्या खालोखाल मका व इतर पिकांचा समावेश होतो. विहिरींच्या पाण्यामुळे बागायत क्षेत्रातील पिके तग धरून असली तरी कोरडवाहू क्षेत्रातील पिके मात्र दमदार पावसाअभावी जळू लागली आहेत.
त्यामुळे आता पाऊस झाला तरी या पिकांना काहीही फायदा होणार नाही, अशी स्थिती आहे. त्यांची पिकवाढीची क्षमता खुंटली आहे.
त्यामुळे उत्पन्नात मोठी घट येणार आहे. सरकारने कोरडवाहू क्षेत्रातील पिकांचे सरसकट पंचनामे करून अनुदान जाहीर करावे, अशी मागणी होत आहे.
"चाळीसगाव तालुक्यात यावर्षी दीर्घकाळ पावसाने दडी मारल्यामुळे सर्वच पिकांची परिस्थिती नाजूक आहे. नऊपैकी तीन मंडळांमध्ये सलग २१ दिवस पाऊस नसल्याने त्या मंडळातील पीकविमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ रक्कम नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली आहे. इतर देखील मंडळातील पिकांची स्थिती सारखीच असल्याने त्या गावातील शेतकऱ्यांना देखील नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. पुढील काळात अशीच परिस्थिती राहिल्यास चाळीसगाव तालुका दुष्काळी जाहीर करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल."- मंगेश चव्हाण, आमदार, चाळीसगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.