मुक्ताईनगर : महिलांचे सक्षमीकरण मोदी सरकारचे धोरण असून, त्या अंतर्गत केंद्र सरकारने राबविलेल्या विविध योजनांचा लाभ महिलांना मिळवून देण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. यापुढेही महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपण कटिबद्ध आहोत. (Raksha Khadse statement Modi Govt committed to empower women)
अशी ग्वाही भाजप महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांनी दिली. येथे मंगळवारी (ता. ३०) श्रीमती रक्षा खडसे यांची भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. श्रीमती खडसे यांनी मुक्ताईनगर शहरातील विविध भागांत जाऊन मतदारांची भेट घेतली. ठिकठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत झाले. माता-भगिनींनी औक्षण करत त्यांना आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या.
मोदी सरकारच्या माध्यमातून महिलांचे बचतगट स्थापन केले. बचत गटांना बँकेच्या माध्यमातून पैसा उपलब्ध करून दिला. त्यातून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. महिला सक्षमीकरणासाठी बचत गटाच्या महिलांसाठी बहिणाबाई महोत्सव, मोफत शिलाई मशीन व फॅशन डिझाईन कोर्स. (Latest Marathi News)
बचत गटाच्या महिलांसाठी विविध कार्यशाळा व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले. त्याचे चांगले परिणाम दिसून आल्याचा दावा श्रीमती खडसे यांनी केला. जलजीवन मिशन (घराघरात नळाद्वारे पाणी), उज्वला योजना (मोफत गॅस कनेक्शन) यासारख्या अनेक योजना मोदी सरकार राबवित असल्याचे त्या म्हणाल्या.
मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचेय
नरेंद्र मोदी यांना आपल्याला सर्वांना मिळून पुन्हा पंतप्रधान बनवायचे आहे, त्यासाठी आपण सर्वांनी माझ्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहनही श्रीमती खडसे यांनी केले. डॉ. राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर, भाजप-शिवसेना यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.