Ramesh Patil esakal
जळगाव

Jalgaon News : राष्ट्रवादी अजित पवार गट उपाध्यक्षपदी रमेश पाटील

Jalgaon News : जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) उपाध्यक्षपदी कल्याणेहोळ (ता. धरणगाव) येथील माजी लोकनियुक्त सरपंच रमेश पाटील यांची नियुक्ती झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

धरणगाव : जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) उपाध्यक्षपदी कल्याणेहोळ (ता. धरणगाव) येथील माजी लोकनियुक्त सरपंच रमेश पाटील यांची नियुक्ती झाली आहे. श्री. पाटील यांनी यापूर्वी पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी काम करून तालुक्यांमध्ये राष्ट्रवादीचा प्रचार आणि प्रसार केला आहे. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस वाढविण्यात रमेश पाटील यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.(Jalgaon Ramesh Patil as Vice President of Nationalist Ajit Pawar Group)

तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीचे संचालक धरणगाव, एरंडोल तालुका शेतकी संघात संचालक, अध्यक्ष म्हणून देखील काम केलेले आहे. त्यांच्या या अनुभवाचा जिल्ह्यात पक्षवाढीसाठी उपयोग होणार असल्याची भावना कार्यकर्त्यांची आहे. त्यांच्या या निवडीबद्दल पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संजय पवार.

अमित पाटील (एरंडोल), डॉ. सुरेश पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, सामाजिक न्याय विभागाचे अरविंद मानकरी, कल्पना अहिरे, उद्योजक एकनाथ पाटील, संभाजीराजे पाटील (पारोळा) यांच्यासह जिल्हा तसेच तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे. (latest marathi news)

राष्ट्रवादी पक्षाशी वैचारिक बांधिलकी आहे. आमचे नेते अजित पवार शब्दाला जागणारा माणूस असून, पक्षाने दिलेली जबाबदारी, दाखविलेला विश्वास, दिलेले प्रोत्साहन हे निश्चितच पक्षवाढीसाठी उपयोगी ठरणार आहे.

जिल्ह्यात स्पर्धा असली तरी राष्ट्रवादीचा अजितदादा गट या स्पर्धेत कुठेही मागे राहणार नाही, यासाठी योग्य नियोजन करून एकत्रित कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT