भुसावळ : तालुक्यात अनेक रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षांच्या रांगा आहेत. वरणगाव येथील शिवाजीनगरजवळ शुक्रवारी (ता. २०) जुन्या महामार्गावरील निंब जातीच्या दोन हिरगार वृक्षांची कत्तल केल्याचे समोर आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी असताना नगरपालिका विभागाने कारवाई हाती घेतली आहे. मात्र, वन विभागाकडे सर्वस्वी अधिकार असल्याने कोणता विभाग झालेल्या वृक्षतोडीवर कारवाई करणार, याकडे शहरातील वृक्षप्रेमींचे लक्ष लागून आहे. (Rampant felling of trees on highway in Varangaon )
शासन स्तरावरून कोट्यवधींचा खर्च करून वृक्षरोपणाची मोहीम राबविली जात आहे. शिवाय, संगोपनासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे; पण वृक्षतोडीकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. ही विदारक स्थिती बदलणे गरजेचे असताना प्रशासन उदासिन दिसून येत आहे. परिणामी, लाकुडतोडे तथा कंत्राटदारांचे चांगलेच फावत असल्याचे दिसते. तालुक्यातील वरणगाव परिसरात सर्रास वृक्षतोड होत असून ही बाब थांबविणे गरजेचे झाले आहे.पर्यावरणाचे संतुलनाकरिता वृक्ष लागवडी करीता वनविभासह शासनाच्या विविध विभांगानी महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविले आहे; मात्र वृक्ष तोडीवर कुठलाही आळा घातला जात नाही.
यामुळे ‘पालथ्या घागरेवर पाणी’ अशीच स्थिती होत आहे. यास प्रशासकीय व्यवस्थेची उदासिनता जबाबदार असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. वरणगाव येथील शिवाजीनगरजवळील महामार्गाच्या कडेला निंबाचे जवळपास पन्नास वर्षे वयाची हिरवेगार आणि डेरेदार दोन वृक्षांची शुक्रवारी (ता. २०) सर्रास वृक्षतोड करण्यात आली. महामार्गाच्या कडेला असलेली झाडे ही बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतात. त्या झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी ही बांधकाम विभागाची असते. (latest maratahi news)
त्याच वृक्षांवर कुऱ्हाड चालविली जात असल्याचे दिसून येत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले. मात्र शासकीय तसेच खासगी भूखंड हिरवेगार करण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. तालुक्यात अनेक रस्त्यांच्या दुतर्फा विविध प्रजातीचे वृक्ष रोपण केले जात असून, हे वृक्ष सध्या लाकूड चोरांसाठी पर्वणी ठरत आहे. याबाबत नागरिकांनी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना कळविले; पण कुठलीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
वन विभागाच्या हद्दीतील जंगल परिसरातही वृक्षांची कत्तल केली जात असल्याचे सिद्ध झाले आहे. परवाना नसताना लाकडाची वाहतूक करणारे वाहन वन परीक्षेत्रात पोलिसांनी वरणगाव परिसरातील मार्गावर गस्त करीत असताना वाहनात आडजात लाकूड नेत असल्याचे दिसून आले. या वाहनाची तपासणी केली असता विनापरवाना ते लाकडाची वाहतूक करीत असल्याचे आढळले. यावरून वाहन जप्त करण्यात आले होते.
परवानाधारक गुलदस्त्यात
या प्रकरणात चालकाने शेतमालक तथा कंत्राटदाराचे नावही सांगितले; पण परवाना कुणीही घेतल्याचे दिसून आले नाही. असाच प्रकार जिल्ह्यात सुरू असून सर्रास वृक्षांची कत्तल केली जात आहे. रस्त्याच्या दुतर्फा तथा वनपरिक्षेत्रातील वृक्षांचीही कत्तल केली जात आहे. या विषयांत वरणगाव नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक पंकज सूर्ववंशी कर्मचाऱ्यांसह कारवाई करतात. मात्र संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे. मात्र या प्रकाराकडे बांधकाम विभाग, वन विभागाने लक्ष देऊन कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.
''शहरातून गेलेल्या महामार्गाच्या कडेला वृक्षतोड झाल्याची माहिती मिळताच वृक्षतोड करणाऱ्यांचे वाहन जप्त केले आहे. मात्र पुढील पोलिस कारवाई आरोग्य विभागांतर्गत मुख्याधिकारी करणार आहेत.''- पंकज सूर्यवंशी, कार्यालयीन अधीक्षक, वरणगाव नगरपालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.