Raver Assembly Constituency  esakal
जळगाव

Raver Assembly Constituency : भाजपचे संघटन, मोदी सरकारच्या कामांचा प्रभाव

दिलीप वैद्य

Raver Assembly Constituency : रक्षा खडसे व श्रीराम पाटील यांच्या लढतीत पाटलांना स्थानिक उमेदवार, म्हणून रावेर मतदारसंघातून मताधिक्य अपेक्षित होते. मात्र, भाजपचे मजबूत संघटन, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामांचा प्रभाव आणि श्रीराम पाटील नवीन असल्याने त्यांचा कमी पडलेला अनुभवामुळे रावेर विधानसभा मतदारसंघातून रक्षा खडसेंनाच मताधिक्य मिळाले. खासदार खडसे यांची उमेदवारी श्रीराम पाटील यांच्यापेक्षा महिनाभर आधी जाहीर झाली होती आणि श्रीमती खडसे उमेदवारी मिळण्याच्या स्पर्धेत असल्याने मागील कार्यकाळातही त्यांनी विविध कार्यक्रम आणि उपक्रमांनिमित्त मतदारसंघाशी संपर्क कायम ठेवला होता. (Constituency BJP organizational impact of Modi government work )

त्या तुलनेत श्रीराम पाटील यांना प्रचाराला जेमतेम महिनाही मिळाला नाही. श्रीराम पाटील रावेरचे रहिवासी असले, तरी व्यवसायानिमित्त ते जळगावलाही वास्तव्याला असतात. येथील शहर व तालुक्यातील विविध संस्था, संघटनांशी त्यांचा संबंध व संपर्क आहे. त्यांना प्रचारासाठी काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांनी सर्वतोपरी सहकार्य केल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह शिवसेना (उबाठा) पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित प्रचार केला.

श्रीराम पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर किंवा केंद्र सरकारच्या कार्यावर टीकाटिप्पणी करण्यापेक्षा स्थानिक मुद्द्यांवर भर दिला. येथील रेल्वेस्थानकावरील रेल्वेचा थांबा, केळी निर्यातीचे प्रश्न, केळी वॅगन्सच्या वाढलेल्या भाड्यात कमी करण्यात खासदार रक्षा खडसे यांना आलेले अपयश, मेगा रिचार्ज या महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्पाला गती देण्यात आलेले अपयश, अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्ग मुक्ताईनगर तालुक्यातून वळविण्याचा प्रश्न त्यांनी मतदारांसमोर मांडले.

याउलट रक्षा खडसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात राज्य शासनातर्फे राबविल्या गेलेल्या विविध योजनांवर भर दिला आणि हाच मुद्दा प्रचारात जास्त प्रभावी ठरला, असे निकालावरून दिसून येते. (latest marathi news)

गट असूनही शिस्तीचे पालन

गेल्या तीन-चार वर्षांत रावेर विधानसभा मतदारसंघातील भाजपत विविध गट दिसून येत आहेत. मात्र, त्या सर्वांचे सहकार्य घेण्यात रक्षा खडसेंना यश आले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि उमेदवारीसाठी इच्छुक असलेले अमोल जावळे यांना उमेदवारी न मिळाल्याने सुरवातीला त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. नंतर पक्षशिस्तीचा भाग म्हणून त्यांनीही पक्षाशी जुळवून घेतले. पक्षाने एकही मोठी जाहीर सभा किंवा मेळावा घेतला नाही.

पक्ष कार्यकर्त्यांनी आपापल्या गावांत उभे केलेल्या संघटनाच्याच जोरावर रक्षा खडसे विजयी झाल्या. रक्षा खडसेंना १ लाख ७ हजार ४२७, तर श्रीराम पाटील यांना ७१ हजार ६९५ मते मिळाली. म्हणजे रक्षा खडसेंना ३५ हजार ७३२ इतके मताधिक्य मिळाले. हे २०१९ च्या निवडणुकीपेक्षा ४-५ हजार मतांनी कमी असले तरीही यावर्षीच्या अपेक्षेपेक्षा जास्तच मताधिक्य मिळाले.

खडसेंचेही लाभले पाठबळ

शेवटच्या चार दिवसांत श्रीमती खडसे यांचे सासरे आणि ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी रावेर विधानसभा मतदारसंघात फिरून विविध कार्यकर्त्यांशी घेतलेल्या भेटीही जादू करून गेल्या, अशी चर्चा आहे. मुस्लिम आणि मराठा मतांचे संभाव्य एकत्रीकरण पाहून उर्वरित अन्य समाज अधिक संघटित झाला आणि त्याचा परिणाम रक्षा खडसे विजयी होण्यात झाला, असेही म्हणावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : जम्मू काश्मीर राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मंजूर

SCROLL FOR NEXT