Jalgaon Lok Sabha Result : जळगाव व रावेर लोकसभेसाठी १३ मेस मतदान झाले. त्याचा निकाल मंगळवारी (ता. ४) जाहीर होणार आहे. मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. मतदानाचा सरासरी कल दुपारी चारपर्यंत स्पष्ट होईल, अशी माहिती जळगाव लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी रविवारी (ता. २) झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. रावेर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अकुंश पिनाटे, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी उपस्थित होते. एमआयडीसीतील एफसीआय गुदामात मतमोजणी होणार आहे. (Jalgaon Raver Lok Sabha 2024 result till 4 pm )
निरीक्षकांची नियुक्ती
मतमोजणीसाठी निरीक्षक म्हणून राहुल गुप्ता (जळगाव शहर, ग्रामीण, जामनेर, अमळनेर विधानसभा मतदारसंघ), सीमाकुमारी उदयपुरी (एरंडोल, चाळीसगाव, पाचोरा), पुष्पांजली दास (चोपडा, रावेर, भुसावळ), महेंदर पाल (जामनेर, मुक्ताईनगर, मलकापूर) यांची नियुक्ती झाली आहे. ते कंसात दिलेल्या विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीचे निरीक्षण करतील.
मतमोजणीसाठी लोकसभेतील १३ विधानसभा संघनिहाय टेबल लावले आहेत. सर्वांत जास्त राउंड जळगाव शहर मतदारसंघात २६, तर जामनेर मतदारसंघात २४ राउंड होतील. एका विधानसभेसाठी १४ टेबलांवर मतमोजणी होईल. एका टेबलवर तीन अधिकारी (मतमोजणी सुपरवायझर, मायक्रो आब्जरवर, काउंटिंग सहाय्यक) व एक शिपाई असतील.
पोस्टल, इटीपीबीएसच्या मतदानपत्रिकेचे स्कनिंसाठी जळगाव लोकसभेसाठी सहा टेबल, रावेरसाठी चार टेबल असतील. त्याची मतमोजणी, होम वोटिंगची मतमोजणी अगोदर होईल. सुमारे तीन हजारांवर मतमोजणीसाठी कर्मचारी असतील. मतमोजणीची सोमवारी (ता. ३) डमी चाचणी घेण्यात येणार आहे. (latest marathi news)
अशी असेल मतमोजणी
*पहाटे पाचला कोणत्या टेबलवर कोणता कर्मचारी असणार यांची लिस्टिंग
*सकाळी साडेसहाला उमेदवारांच्या प्रतिनिधीला प्रवेश
*सातला गेट उघडणार
*पावणेआठला ईव्हीएम असलेली स्ट्रॉंग रूम उघडणार
*आठला पोस्टल मतमोजणी सुरू
*साडेआठला ईव्हीएम मोजणी सुरू
*दर अर्धातासाने फेरीनिहाय निकाल जाहीर करणार
पाचशेवर पोलिस बंदोबस्त
मतमोजणीदरम्यान कायदा व सुव्यवस्था आबाधित राहावी, यासाठी दोन अतिरिक्त पोलिस अधीक्षक, दोन डीवायएसपी, चार पोलिस निरीक्षक, २२ सहाय्यक निरीक्षक, ३४१ पोलिस, ५१ महिला पोलिस, २ एसआरपी तुकडी, दोन सीआरपीएफ तुकडी असणार आहेत. मतमोजणी केंद्रात मोबाईल, लॅपटाप नेण्यास बंदी आहे.
मतमोजणी केंद्रात ओळखपत्राशिवाय जाता येणार नाही, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी दिली. जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणी पोलिस बंदोबस्त राहणार आहे. मतमोजणीनंतर उपद्रव घालणाऱ्या २०१ संशयितांची यादी तयार केली असून, त्यांना तीन दिवस हद्दपार करण्याचे आदेश काढले आहेत.
मिरवणुका काढता येणार नाही
मतमोजणीच्या निकालानंतर दोन दिवस विजयी मिरवणुका काढता येणार नाहीत. त्यासाठी तीन दिवसांनंतर अटी शर्थी टाकून परवानगी देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.