Grass and bushes growing in front of bus station toilets & unsanitary conditions in bus station conductors, conductors toilets. esakal
जळगाव

Raver MSRTC Depot : रावेर उत्पन्नात अव्वल; प्रवासीसेवेचा बोजवारा! पन्नास वर्षांपासून दुर्लक्षित; प्रवाशांसह कर्मचारीही त्रस्त

Latest Jalgaon News : जिल्ह्यात सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे आगार असतानाही येथील समस्यांकडे वरिष्ठांचे लक्ष नसल्याची कर्मचाऱ्यांचीच तक्रार आहे.

प्रदीप वैद्य

रावेर : आगाराच्या स्थापनेपासून म्हणजे सुमारे ५० वर्षांपासून दुरुस्त न केलेले आगाराचे आवार, अस्वच्छ स्वच्छतागृहे, मोडकळीस आलेला हिरकणी कक्ष, गाड्यांचे अनियमित वेळापत्रक यासह असंख्य समस्यांना येथील आगाराला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे आगार असतानाही येथील समस्यांकडे वरिष्ठांचे लक्ष नसल्याची कर्मचाऱ्यांचीच तक्रार आहे. (Raver MSRTC Depot Neglected for fifty years)

येथील आगाराची १९७४ मध्ये निर्मिती झाली होती. त्यानंतर आगारातील आवारात साधे ‘फ्लोरिंग’चे देखील काम झालेले नाही. त्यामुळे संपूर्ण आगार खड्डेमय झाले आहे. पावसाळ्यात आगारातील खड्ड्यांमध्ये पाणी साचते. ज्यामुळे आगारातून बसगाड्या बाहेर काढणे कठीण होते. यामुळे प्रवाशांसह बसचालकही त्रस्त झाले आहेत.

अस्वच्छ स्वच्छतागृह

आगारातील स्वच्छतागृहही स्वच्छ नसतात. प्रवाशांसाठी बस स्थानकाच्या मागे असलेल्या स्वच्छतागृहासमोर मोठ्या प्रमाणात गवत आणि झुडपे वाढली आहेत. अस्वच्छतेमुळे महिला तिकडे जाणे टाळतात. चालक, वाहकांसाठी असलेल्या स्वच्छतागृहांचीही काही वेगळी स्थिती नाही.

इतर आगारातील चालक वाहकांसाठी असलेल्या स्वच्छतागृहात अधिकच घाण असते. अस्वच्छतेमुळे येथे कमालीचा दुर्गंध येतो. त्याच्या शेजारीच वाहक, चालकांसाठी झोपण्याची व्यवस्था आहे. अशा दुर्गंधीयुक्त वातावरणात कशी झोप येईल? असा संतप्त प्रश्न वाहकांमधूनच उपस्थित होत आहे.

हिरकणी कक्ष मोडकळीस

बस स्थानकातील हिरकणी कक्षाची अवस्था अत्यंत बिकट बनली आहे. या कक्षात स्वच्छता केली जात नसल्याने प्रचंड धूळ साचली आहे. कक्षातील लाईट व पंखाही बंद असून हा कक्ष मागील बाजूस मोडकळीस आला आहे. कक्षातून बाहेरचे आणि बाहेरून आतले सर्व काही दिसत असल्याने महिला या कक्षाचा वापर तरी कसा करतील? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आगारातील उपहारगृहही अनेक वर्षांपासून बंद आहे. आवारात कुठेही चहा पिण्याची सोय नाही.

विस्कळीत वेळापत्रक

या आगारातून जाणाऱ्या बसगाड्या बऱ्याचदा उशिरा निघतात. येताना मात्र नियोजित वेळेपूर्वी परत येतात. त्यामुळे पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याचे दिसून येत आहे. विस्कळित वेळापत्रकामुळे प्रवाशांनाही त्रास सोसावा लागत आहे. (latest marathi news)

दुरुस्ती शेड अपुर्ण

आगारातील बस गाड्या दुरुस्त करण्यासाठी शेड छोटे असून त्यात केवळ दोनच बस गाड्या दुरुस्त होतात. बस गाड्यांची संख्या जास्त असल्याने आणि दुरुस्तीचेही प्रमाण वाढल्याने या बस गाड्या बाहेर उन्हात किंवा पावसात दुरुस्त करण्याची वेळ येथील कर्मचाऱ्यांवर येते.

"हिरकणी कक्ष, स्वच्छता गृह यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव विभागीय कार्यालयाकडे सादर केलेला आहे. उपहारगृहासाठी कोणीही निविदा भरलेली नाही. त्यामुळे त्यासाठी पुन्हा प्रयत्न करू. ऑनलाईन रिझर्व्हेशन रावेर स्थानकातून सुरू करण्याची परवानगी मिळण्याची प्रतीक्षा आहे."

- इरफान पठाण, आगार व्यवस्थापक, रावेर आगार.

:येथील आगारात बहुतांश जुन्या बसेस आहेत. त्या कुठेही व केव्हाही बंद पडतात. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. शासनाने नवीन बसेस आगाराला उपलब्ध करून दिल्या पाहिजे.:- हरिभाऊ पाटील, प्रवासी, खिरवड (ता. रावेर)

"बस स्थानकासह आगाराच्या आवारात ठिकठिकाणी लहानमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळयात खड्ड्यातील पाणी अंगावर उडते. त्यानंतर बसेस जाताना येताना धूळ उडते. यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण करण्यासाठी महामंडळाने पाठपुरावा करावा."- सोपान पाटील, विद्यार्थी, उटखेडा (ता. रावेर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT