Employees removing unauthorized hoardings in the city esakal
जळगाव

Jalgaon News : अखेर रावेरचे अनधिकृत होर्डिंग हटविले! झेंडे लावल्याने झाला वाद; शहरातील अतिक्रमणही काढण्याची अपेक्षा

Latest Jalgaon News : विविध राजकीय नेत्यांचे वाढदिवस आणि शुभेच्छांचे फलक यावर लावले जात होते. या होर्डिंगवर १४ सप्टेंबरला दोन राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाचे बॅनर दोन्ही बाजूला लागल्यानंतर तिथे अन्य झेंडेही लावलेले आढळून आले.

सकाळ वृत्तसेवा

रावेर : अनधिकृत झेंडे लावल्याने निर्माण झालेल्या वादातून पालिकेने येथील सावदा रस्त्यावरील मोठे अनधिकृत होर्डिंग मंगळवारी (ता. १७) युद्धपातळीवर हटविले. पालिकेने शहरातील अतिक्रमणाविरुद्धही अशीच कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. (Raver unauthorized hoarding finally removed)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून सावद्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर नागझिरी नाल्यानजीक एक प्रचंड होर्डिंग गेल्या दोन वर्षांपासून उभे राहिले होते. विविध राजकीय नेत्यांचे वाढदिवस आणि शुभेच्छांचे फलक यावर लावले जात होते. या होर्डिंगवर १४ सप्टेंबरला दोन राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाचे बॅनर दोन्ही बाजूला लागल्यानंतर तिथे अन्य झेंडेही लावलेले आढळून आले.

यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आणि दीड-दोनशे युवकांचा जमाव तिथे जमला. दरम्यान, पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल आणि पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून युवकांना पांगविले आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करून झेंडे काढून टाकले.

दरम्यान, हे होर्डिंग अनधिकृत असल्याचे व होर्डिंग मालकास नोटिसा दिल्या असल्याचे पालिका प्रशासनाने सांगताच हे होर्डिंग काढण्याबाबतही निर्णय घेण्यात आला आणि शहरातील सर्वात मोठे पण अनधिकृत असलेले हे होर्डिंग मंगळवारी (ता. १७ ) काढून घेण्यात आले. (latest marathi news)

रावेर शहर हे अनधिकृत बांधकामे, टपऱ्या यांचे माहेरघरच आहे.या सर्व अतिक्रमणांना विविध राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांचे पाठबळ आहे. या अतिक्रमणांमुळे नागरिकांना रस्त्यावर चालणे अवघड होत आहे. हे सर्वच अतिक्रमण काढावे व शहर अतिक्रमण मुक्त अशी मागणी शांतता समितीचे सभेत पोलिस अधीक्षकांसमोर नागरिकांनी केली होती.

यावर पालिका प्रशासनाने पोलिस बंदोबस्त मागितला तर अतिक्रमण काढण्यासाठी आपण तो उपलब्ध करून देऊ, असे पोलिस अधीक्षकांचे म्हणणे होते. आता पालिकेवर कोणाचीही राजकीय सत्ता नसल्याने अतिक्रमण काढायला राजकीय विरोध होणार नाही.

पालिका प्रशासनाने कणखर भूमिका घेऊन शहर अतिक्रमण मुक्त करावे, पोलिस अधिकारी पोलिस संरक्षण देण्यास तयार असताना पालिकेने पुढाकार घ्यावा व अतिक्रमण काढावे; अन्यथा यातूनच तणाव वाढून विवाद निर्माण होण्याची भीती जाणकार नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

Priyanka Gandhi Vadra :प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान, म्हणाल्या- तुम्ही मंचावरुन एकदा जाहीर करा...

Ahilyanagar Crime : मोठा शस्‍त्रसाठा जप्त...जम्‍मू-काश्‍मिरच्या आरोपींकडून ९ रायफली, ५८ काडतुसे जप्त

Nitin Raut Video: 'जय भीम' म्हटल्याने विलासरावांनी मंत्रिपद नाकारलं; काँग्रेस नेते नितीन राऊतांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : प्रियंका गांधी बाळासाहेबांवर भरभरुन बोलल्या; त्यांनी भाजपचे दात घशात घातले, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

SCROLL FOR NEXT