Cotton crop flourished due to satisfactory rains for three days. esakal
जळगाव

Jalgaon News : कपाशीच्या पेरणीत बाराशे हेक्टरने घट! बागायतीसह खरिपाच्या 96 टक्के पेरण्या; उडीद, मक्याच्या लागवडीत वाढ

सकाळ वृत्तसेवा

रावेर : तालुक्यात बागायती कपाशीसह खरिपाच्या ९६ टक्के पेरण्या झालेल्या आहेत. त्यांची उगवणही छान झाली आहे. दरम्यान, कपाशीच्या पेरणीत बाराशे हेक्टरने घट झाली आहे. उडीद, मका, तलर पिकांच्या पेरणीत वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसां पासून तालुक्यात समाधान कारक पाऊस सुरू आहे. तालुक्यातील धरणांच्या साठ्यात वीस ते ३५ टक्के पाणी पातळीत वाढ झाली आहे. (Jalgaon Reduction in cotton sowing by 12 hundred hectares)

कापूस बागायती १४,९८२ हेक्टर, जिरायती कापूस ९८६ (१७,०४५), मका ३,७८९ (२,१५०), ज्वारी २,१९० (२,४५०), मूग ४८० (४५०), उडीद ६२० (९८०), तूर ८९० (७५०), सोयाबिन ६९० (७००) एकूण खरीप - २७,२६३ हेक्टर क्षेत्रावर ९६ टक्के पेरण्या झाल्या आहेत. भाजीपाला १९०, मसाला पीक - २०९०, फळपीक १७१, इतर १९४, हळद १,१६३, केळी १७,७८४, जुनी केळी ६,५०५.

कपाशी पेरणीत घट

मागील वर्षी कापसाला पुरेसा भाव नव्हता. यामुळे वर्षाच्या तुलनेत कपाशीच्या पेरणीत १ हजार १९४ हेक्टर क्षेत्र घटले आहे, तर ज्वारी २३५, सोयाबीन १६० हेक्टरने घट झाली आहे. तर उडीद ३०३ मका १८३, तूर १०० तसेच मूग व मसाले पीक हळद पिकाच्या पेरणीत वाढ झाली आहे. (latest marathi news)

धरण साठ्यात वाढ

तालुक्यात मागील वर्षाच्या तुलनेत कमी पाऊस झाला. गेल्या दोन, तीन दिवसांपासून तालुक्यात समाधानकारक पाऊस पडत आहे. आतापर्यंत २२६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील सहा प्रकल्पांपैकी मंगरूळ ७४.६२ टक्के, सुकी ८४.९१ टक्के तर अभोरा धरणात ६१.३७ टक्के जलसाठा आहे. या धरणांमध्ये २० ते ३५ टक्के जलसाठ्यात वाढ झाली आहे. मागील वर्षी सर्व धरणे ओव्हर फ्लो होऊन नदी, नाले दुथडी भरून वहात होते. मात्र या वर्षी नदी नाल्यांना अद्याप ही पूर आलेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT