MLA Raju Mama Bhole performing Maha Aarti at Omkareshwar temple on the occasion of Mahashivratri, in second photo Crowd of devotees for darshan in temple. esakal
जळगाव

Maha Shivratri 2024 : हर हर शंभो...चा गजर शिवमंदिरात; महाशिवरात्रीनिमित्त धार्मिक कार्यक्रम

Maha Shivratri 2024 : शिवकॉलनी येथील श्री गुरुदत्त शिवकॉलनी विकास बहुउद्देशीय मंडळातर्फे श्री रुद्रेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त महाअभिषेक पूजा कार्यक्रम झाला.

सकाळ वृत्तसेवा

Maha Shivratri 2024 : हर हर शंभो...ओम नमो शिवाय....च्या गजरात आज शहरातील विविध शिवमंदिरात गर्दी होती. महाशिवरात्रीनिमित्त सकाळपासूनच अभिषेक, पूजा अर्चा प्रसाद वाटप झाले. दिवसभर भाविकांनी शिवमंदीरात दर्शनसाठी गर्दी केली होती. श्री शंकराला बेलपत्र प्रिय असते. यामुळे आज बेलपत्राला अधिक मागणी होती.

शिवकॉलनी येथील श्री गुरुदत्त शिवकॉलनी विकास बहुउद्देशीय मंडळातर्फे श्री रुद्रेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त महाअभिषेक पूजा कार्यक्रम झाला. (Jalgaon Religious program on occasion of Mahashivratri)

सकाळी महाशिवरात्रीनिमित्त नऊला पूजनाला सुरुवात झाली. गणपती पूजन पुण्याह वाचन मातृका पूजन, सर्वतोभद्र मंडल स्थापन, नवग्रह पूजन, रुद्र देवता पूजन, रुद्रेश्वर महादेवाला रुद्र अभिषेक, मंडळ देवता हवनपूर्णाहूती नंतर महाआरती झाली. पूजेसाठी गुरुजी प्रधान आचार्य कृष्णा जोशी, गुरुजी दिनेश जोशी, आदित्य जोशी, दिगंबर काळे, गुरुजी योगेश जोशी या गुरुजींनी पूजा विधि पार पडला.

यावेळी भावीकांना केळी साबुदाणा खिचडी, तीस किलो राजगिरा लाडू प्रसाद सकाळपासून करण्यात आले. पूजेसाठी श्री गुरुदत्त विकास बहुउद्देशीय मंडळाच्या अध्यक्षा सुलोचना बाविस्कर, पांडुरंग बाविस्कर यांनी सहकार्य केले. प्रमोद पंढरीनाथ शूर, रंजना शूर यांनी सहपत्नीक पूजा केली. सायंकाळी जागतिक महिला दिन कार्यक्रम झाला. प्रतिकूल कष्टकरी महिलांचा सन्मान करण्यात आला. रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण झाले.

ब्रह्माकुमारीजतर्फे अमरनाथ देखावा

येथील ब्रह्माकुमारीज् तर्फे महाशिवरात्री पर्वानिमित्त अनेकाविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात २० फुटी अमरनाथ देखावा, शिवध्वजारोहण, शिव प्रतिज्ञा व शिवमंदिरात आध्यात्मिक चित्रप्रदर्शनी यांचा समावेश आहे.

८८ कर्तबगार महिलांच्या हस्ते दिप प्रज्वलन

भारतात सर्वत्र महाशिवरात्री पर्व मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जाते. त्यानिमित्त ब्रह्माकुमारीज्च्या स्थानिक ढाके कॉलनी शाखेतर्फे सकाळी विविध क्षेत्रातील ८८ कर्तबगार महिलांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन शिवरात्री महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी ब्र.कु. मिनाक्षीदीदींनी शिवध्वजारोहण केले.

ब्र.कु. राजबहन यांनी शिवरात्रीचे आध्यात्मिक रहस्य सांगितले. संचलन ब्र.कु. वर्षा बहन व ब्र.कु. हेमलता बहन यांनी केले. तदनंतर अवगुण मुक्त, व्यसन व विकारमुक्त बनण्यासाठी शिवप्रतिज्ञा उपस्थितांना दिली गेली.

ओंकारेश्वर मंदिर प्रांगणात भव्य २० फुटी भगवान अमरनाथची प्रतिकृती भाविकांचे विशेष आकर्षण ठरली. ओंकारेश्वर मंदिर आवारात मानव जीवन दिव्यीकरण आध्यात्मिक प्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले.

त्यात स्वत:चा वास्तविक परिचय, परमात्म्याची दिव्य कर्तव्य, सृष्टीचक्राचे रहस्य, मृत्यूनंतर काय? मृत्यूपूर्वी काय या सारख्या विविध आध्यात्मिक रहस्य स्पष्ट करण्यात आलीत. त्याचबरोबर राजयोगाची विधी आणि अनुभूतीही करविली जाणार आहे. असाच कार्यक्रम निमखेडी व उमाळा येथील शिवमंदिरांच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT