Water Scarcity esakal
जळगाव

Jalgaon Water Scarcity : 15 ऑक्टोबरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा; जळगावकरांना 2 दिवसांआडच पाणी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Water Scarcity : वाढत्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने धरणातील साठे कमी झाले आहेत. सुदैवाने जळगाव शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात तब्बल ६० टक्के जलसाठा आहे. त्यामुळे जळगावकरांना दोन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा कायम राहणार आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत हा साठा पुरेल. मात्र, जळगावकरांनी पाणी जपून वापरावे, असे अवाहन महापालिकेने केले आहे. (Jalgaon residents get water only every 2 days )

जळगाव शहराला वाघूर धरणातून पाणीपुरवठा होतो. सद्यस्थितीत धरणात १५१.५१ दशलक्ष घनमीटर साठा आहे. त्याची टक्केवारी साधारणत: ६०.९६ टक्के आहे. जळगाव शहरात प्रत्येक भागांत दोन दिवसांआड पाणीपुरवठा होतो. साधारणत: १५ ऑक्टोबरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे. जून महिन्यानंतर पाऊस पडल्यास पाणीसाठ्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे.

जळगाव शहरातील बहुतांश भागात अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा होत आहे. संपूर्ण शहरात तब्बल ८० हजार नळकनेक्शन आहेत. यात घरगुती कनेक्शनची संख्या अधिक आहे. वाघूर धरणात पुरेसा पाणीसाठा असल्यामुळे जळगावकरांना वाढत्या तापमानात पाणीटंचाईची झळ जाणवणार नाही. मात्र, जळगावकरांनी पाण्याची कोणत्याही प्रकारे नासधूस करू नये, तसेच नळांना तोट्या बसवून घ्याव्यात, असे आवाहन महापालिकेने केले आहे. (latest marathi news)

अमृत योजनेच्या जलवाहिनीतून प्रत्येक नळकनेक्शनधारकांना निळ्या रंगाच्या नळ्याद्वारे जोडणी देण्यात आली आहे. मात्र, अनेकांनी अद्यापही निळ्या रंगाच्या नळ्याची जोडणी आपल्या मूळ जोडणीला केलेली नाही. त्यामुळे महापालिकेतर्फे पाणी सोडण्यात आल्यानंतर अनेक भागात निळ्या नळातून सर्रार पाणी वाहताना दिसत असते. नागरिकांनी याबाबत दक्षता घेऊन या नळ्यांची जोडणी करून घ्यावी, असे आवाहनही महापालिकेने केले आहे.

''जळगाव शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात तब्बल ६१ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे जळगाव शहरात पाणीटंचाई जाणवणारा नाही. मात्र, नागरिकांनी पाणी जपून वापरावे, तसेच पाण्याची नासधूस करू नये.''-गणेश चाटे, उपायुक्त, महापालिका, जळगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT