पारोळा : वाहन चालविण्यासाठी वयाची किमान अकरा वर्षे पूर्ण असावीत, असा नियम असताना शहरात मात्र हा नियम केवळ कागदापुरताच असल्याचे दिसून येत आहे. शहरात हजारोंच्यावर दुचाकी आहेत. यातील बहुतांश दुचाकी ज्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नाही, असे अल्पवयीन मुले- मुली चालवताना दिसतात. या प्रकारामुळे अपघातांचा धोका वाढला असून वाहन नियमांचे देखील उल्लंघन होत आहे. ( Risk of accident due to minor drive Two wheelers in city )
त्यामुळे ‘आरटीओ’ विभागासह वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देऊन अल्पवयीन मुलामुलींचे वाहन चालविण्याच्या बाबतीत समुपदेशन करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सध्याच्या स्पर्धेच्या व धकाधकीचे युगात सायकलींचा जागा दुचाकी, चारचाकींनी घेतली आहे. पालकांचाही आपल्या मुलांना दुचाकी घेऊन देण्याकडे कल वाढला आहे. नियमानुसार, जे वाहन चालविण्यासाठी अद्याप पात्र नाहीत, अशा अठरा वर्षांखालील मुलामुलींकडे देखील गिअरच्या गाड्या दिसून येतात.
आठवी, नववीचे विद्यार्थी देखील शाळांमध्ये येतात, सर्रास दुचाकी घेऊन येतात. खासगी क्लासेसच्या आवारात मोठ्या प्रमाणावर दुचाकी लावलेल्या असतात. बऱ्याचदा हे विद्यार्थी रस्त्यावरुन सुसाट वेगाने वाहने चालवतात. काही वेळा तर त्यांचे वाहन चालवताना मोबाईलवर देखील बोलणे सुरु असते. तर काही वेळा इतर मित्र, मैत्रिणींना आपल्या दुचाकींवर बसवले जाते. या सर्व प्रकारांमुळे अपघाताचा धोका असतो. मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पालकांनीच अल्पवयीन मुलामुलींना दुचाकी वाहन देऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (latest marathi news)
शाळांमध्ये मार्गदर्शन करावे
सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने ‘आरटीओ’ विभागासह पोलिसांच्या वाहतूक शाखेने शाळाशाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. वाहन चालविण्याचा अधिकृत परवाना ज्यांच्याकडे नसेल, अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलावून समज द्यावी. रस्त्याने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अल्पवयीन मुलांचे समुपदेश करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलिसांनी अशी कारवाई केल्यानंतर पालकच पोलिसांना विनंती करुन त्यांच्या मुलांना सोडून देण्यास सांगतात. त्यामुळे अनेकदा पोलिसही अशा कारवाई करताना हतबल होताना दिसतात. त्यामुळे शिक्षकांनी देखील याबाबतीत पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हिताचे ठरणार आहे.
''अल्पवयीन अथवा अठरा वर्षांखालील विद्यार्थ्यांनी मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन केले किंवा वाहन चालवताना अपघात झाला तर अशा मुलांच्या पालकांवर गुन्हा दाखल केला जातो. यामुळे अल्पवयीन मुलामुलींनी कायद्याच्या चौकटीत राहून बेकायदेशीरपणे रस्त्यावर दुचाकी चालवू नये. पारोळा पोलिसांची याकडे करडी नजर असून असा प्रकार आढळल्यास नियमानुसार संबंधितांविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.''- सुनील पवार, पोलिस निरीक्षक ः पारोळा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.