Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon News : शहरात 7 रस्त्यांचे डांबरीकरण, 8 रस्त्यांचे खडीकरण

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : सरते वर्षेही जळगावकरांना खड्ड्यांतूनच काढावे लागले. मात्र आज २०२३ उजाडले आहे. आगामी वर्ष जळगावकरांना खड्डेमुक्त असणार आहे. ४२ कोटींच्या निधीतून ४९ रस्त्यांचे काम मार्गी लागत आहे. त्यापैकी पंधरा रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. त्यातील तब्बल सात रस्त्यांचे डांबरीकरण झाली आहे, तर आठ रस्त्यांचे खडीकरण व पॅच वर्क झाले आहे.

खड्डे आणि जळगावकर असे जणूकाही समीकरणच गेल्या पाच वर्षांपासून झाले आहे. सरते २०२२ हे वर्षही जळगावकरांचे खड्ड्यांतून मार्ग काढण्यातच गेले आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी कोटीच्या कोटी निधी असल्याचे सांगितले जात आहे.

मात्र प्रत्यक्षात रस्त्याच्या कामाबाबत फारसे आशादायी चित्र जळगावकरांना दिसून येत नव्हते; परंतु आता वर्षाच्या शेवटी का होईना रस्त्यांच्या कामांना वेग आला आहे. त्यामुळे जळगावकरांना आगामी वर्ष हे खड्डेमुक्त जाईल, अशी अपेक्षा आहे. ( Jalgaon Road Construction update 42 crore funds be used to complete work of 49 roads new year Jalgaon news)

४२ कोटींच्या निधीला चालना

शहरातील रस्त्यासाठी शासनाने ४२ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यातून शहरातील मुख्य रस्त्यांसह ४९ रस्ते करण्यात येणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातूनच ही कामे होणार आहेत. शासनाकडूनही या निधीसाठी चालना मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात त्याबाबत घोषणा केली आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामाला चालना मिळेल.

सात डांबरीकरण, आठ खडीकरण

शहरातील ४९ रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला आहे. ‘अमृत’योजनेच्या कामामुळे महापालिकेने १५ रस्त्यांची कामे करण्यास ना-हरकत दिलेली आहे. त्यामुळे त्या रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. मक्तेदार श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चर यांच्यामार्फत ही कामे होत आहेत.

याबाबत त्यांनी सांगितले, की महापालिकेने ‘ना-हरकत’ दिलेल्या १५ रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यापैकी सात रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले असून, त्यावर सील कोट बाकी आहे. तोही लवकरच करण्यात येणार आहे. तर आठ रस्त्यांचे खडीकरण करण्यात आले असून, त्यातील काही रस्त्यांचे पॅचवर्कही करण्यात आले आहे. शासनाकडून अद्यापपर्यंत १४ कोटींचा निधीही प्राप्त झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

डांबरीकरण, खडीकरण रस्ते असे

डांबरीकरण- गणेश कॉलनी ते कोर्ट चौक, तालुका पोलिस ठाणे ते निमखेडी, देवंद्रनगर ते मोहाडी, संभाजीनगर चौक ते मोहाडी, गिरणा टाकी ते पॉलिटेक्निक कॉलेज, दूध फेडरेशन ते इंद्रप्रस्थ भारतनगर, खेडी रिंगरोड ते खेडी खडीकरण- दूध फेडरेशन ते शिवाजीनगर पूल, डीएसपी चौक ते वाघनगर, सायली हॉटेल ते स्टेडियम, डी-मार्ट ते काव्य रत्नावली चौक, बजरंग बोगदा ते पिंप्राळा रेल्वे गेट (नवसाचा गणपती मंदिर रस्ता, एकलव्य चौक ते पॉलिटेक्निक, मोहाडी रोड नुक्कड चौक ते लांडोरखोरी उद्यान.

"शहरातील रस्त्यांची कामे वेगाने सुरू आहेत. सात रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहेत. आठ रस्त्यांचे खडीकरण झाले आहे. त्याचेही डांबरीकरण लवकरच करण्यात येईल. मध्यतंरी मुरूम बंद झाल्याने काम थांबले होते. आता परवानगी मिळाली आहे."

-आदित्य खटोड, संचालक, श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चर, जळगाव

"शहरातील रस्त्यांसाठी निधी आणण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. शासनाकडून ४२ कोटी रुपये मंजुरीव्यतिरिक्त आपण चार महिन्यांत शहरासाठी ३५ कोटींचा निधी आणला आहे. टप्प्याटप्प्याने निधी आणणारच आहोत. रस्त्यासाठी कोणताही निधी कमी पडणार नाही. फक्त सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा महापालिका अधिकाऱ्यांनी कामे करून घेणे गरजेचे आहे."

-सुरेश भोळे,आमदार, जळगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT