पारोळा : येथील कजगाव रस्त्यावरील चौफुलीवर मोठमोठे खड्डे झाल्यामुळे अनेक अवजड वाहने रस्त्यावर अडकून वाहतूक ठप्प झाली. या वेळी माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी चक्क रस्त्यावर उतरून पोलिसाच्या मदतीने वाहतूक सुरळीत केली. या वेळी दीड ते दोन तास वाहतुकीची कोंडी झाल्याचे दिसून आले. (Kajgaon road traffic stopped due to Vehicle stuck in potholes)
दुधाचा टँकर महामार्गावरील खड्ड्यात अडकल्याने मंगळवारी (ता. २३) दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास कजगाव रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. माजी मंत्री डॉ. सतीश पाटील हे काही कामानिमित्त महामार्गाकडे निघाले होते.
वाहतूक ठप्प असल्याने नेमके काय घडले म्हणून त्यांनी विचारणा करीत थेट रस्त्यावर उतरत डॉ. पाटील यांच्यासह पोलिसांनी ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली. कजगाव चौफुलीजवळील रस्त्यावर झालेल्या खड्ड्यांमुळे अनेक दुचाकींचे किरकोळ अपघात होत असतात. तरी या रस्त्याची डागडूजी करावी, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.
पावसात रस्ता गेला वाहून
काही दिवसांपूर्वी ‘सकाळ’ने ‘कजगाव रस्त्यावरील खड्डा जीवघेणा’ अशा शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्या संदर्भात संबंधित विभागाकडून मुरूम टाकून तो खड्डा बुजविण्यात आला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी जोरदार पावसामुळे या रस्त्यावरील खड्डा ‘जैसे थे’ झाल्यामुळे याबाबत वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे. (latest marathi news)
तसेच बुजलेला खड्डा गेला कुणीकडे’ असे म्हणत थातूरमातूर केलेल्या कामाबाबत नाराजी व्यक्त करून या खड्ड्यांबाबत योग्य ती कचखडी व डांबर टाकून तो बुजविण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
रुग्णालय-अमळनेर नाका खड्डेमय
राष्ट्रीय महामार्ग ५३ म्हणून या रस्त्याची ओळख आहे. दरम्यान, शहरातून बायपास गेला असला तरी कुटीर रुग्णालय ते अमळनेर नाका या मार्गातून बससह अनेक वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणावर असते. मात्र, या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडल्यामुळे ऐन पावसाळ्यात वाहन चालवणे जिकरीचे झाले आहे. याबाबत योग्य ती अंबलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.