Jalgaon News : शहराची वाढती लोकसंख्या व वाढणारा विस्तार पाहता तालुका म्हणून ओळख निर्माण केलेल्या भुसावळ शहराच्या असुविधांमध्ये अर्धवट रस्ता दुभाजकांचीदेखील आणखीन एक भर पडली आहे. शहरातील ही दुभाजकेच आता अपघातांना निमंत्रण देऊन आरोग्याचा गंभीर प्रश्नदेखील उपस्थित करू पाहात आहेत. भुसावळकरांचे दुर्देव म्हणजे शहर सुशोभीकरणासाठी बांधण्यात आलेल्या या दुभाजकांचा उपयोग आता कचराकुंडी म्हणून वापरण्यास सुरुवात झाल्याचे चित्र आता पाहावयास मिळत आहे. (road divider in Bhusawal has become garbage dump )
शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी व त्यासोबतच शहरांच्या सौंदर्यात भर पडावी, यादृष्टीने शहराच्या विविध मार्गांवर लांबलचक दुभाजके बांधण्यात आलेली आहेत. बांधण्यात आलेल्या या दुभाजकांमध्ये माती टाकून हिरवेगार व फुलेदार सुंदर झाडी लावून रस्ता व सुशोभीकरण करण्यात येईल, असे आश्वासन नगरपालिकेच्या वतीने सुरुवातीला देण्यात आले होते. परंतु, वर्षा मागे वर्षे लोटली गेली तरीदेखील या दुभाजकांची परिस्थिती आजही ‘जैसे थे’च दिसून येत आहे.
अनेक निरुपयोगी वस्तू, कचरा या दुभाजकांमध्ये टाकला जात आहे. आता तर बहुतेक ठिकाणी पावसाचे पाणीदेखील या दुभाजकांमध्ये साचत आहे. त्यामुळे त्यामधून दुर्गंधी पसरून रोगराईला आमंत्रणच मिळत आहे. भुसावळ हे तालुक्याचे शहर आहे. या शहरात स्थानिक आमदार, खासदार यांचे दौरे, प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची येथून नेहमीची ये-जा असते. (latest marathi news)
मात्र, तरीदेखील त्यांचे या गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने भुसावळकरांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहराच्या सौंदर्यात भर पडावी, यासाठीच कोट्यवधी रुपयांचा खर्च करून तयार केलेल्या या रस्त्यांवरील दुभाजकांचे विद्रुपीकरण होत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
चौपदरीकरणासाठी कोट्यवधींचा खर्च!
भुसावळ शहराच्या आर्थिक, सामाजिक, औद्योगिक विकासाला चालना देणाऱ्या शहरातील विविध रस्त्यांचे चौपदरीकरण करण्यात आले आहे. रात्रंदिवस या मार्गांवर वर्दळ असते. शहराच्या चौकस भागातील मार्गांचे चौपदरीकरण पूर्ण झाले आहे. तेथून पुढे काही ठिकाणी चौपदरीकरण, तर काही ठिकाणी रुंदीकरणदेखील करण्यात आले आहे.
कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून या रस्त्यांमध्ये दुभाजक बसविण्यात आलेले आहेत. मात्र, प्रशासनाला या दुभाजकांमध्ये फुलझाडे लावण्याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. म्हणून याबाबत प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तत्काळ या दुभाजकांत माती व मुरूम टाकून त्यात सुशोभीकरणासाठी फुलझाडे लावावीत, अशी मागणी भुसावळकरांकडून केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.