Due to lack of drains on both sides of the road, there is stagnant water. esakal
जळगाव

Jalgaon News : वरणगावात रस्ते झाले, गटारींचा विसर! पाण्याचा निचरा होणार कसा? पुन्हा रस्ते खराब होण्याची भीती

सकाळ वृत्तसेवा

वरणगाव (ता. भुसावळ) : शहरातील अंतर्गत आणि बाह्य रस्ते नगरपरिषद व आमदान निधी अंतर्गत नव्याने करण्यात आले आहेत. मात्र रस्त्यावरील नैसर्गिक पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार बांधकामाचा विसर पालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाला पडल्याचा आरोप भाजपचे सुधाकर जावळे यांनी केला असून, साचलेल्या पाण्यामुळे रस्ते लवकरच खराब होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. ( Roads were built in Varangaon but forget about sewers)

शहरातील बाह्य भागातील रावजी बुवा ते रेल्वेस्थानक डांबरी रस्त्यांची अवस्था दयनीय झाली होती. त्या अनुषंगाने आमदार संजय सावकारे यांच्या निधीतून बसस्थानकापर्यंत डांबरीकरण व पुढे रेल्वेस्थानकापर्यंत सिमेंट कॉंक्रिटचा करण्यात आला आहे. शहरांतर्गत विविध प्रभागांमध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून कुठे कॉक्रिट तर कुठे पेव्हरब्लॉक बसवून रस्ते निर्मित केले गेले आहेत.

मात्र रस्त्यावरील पाण्याचा निचरा होणे अपेक्षित आहे. त्या साठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूने गटारींचे बांधकाम करणे बंधनकारक आहे. शहरांत कोट्यवधींचे रस्ते बनविण्यात आले. मात्र निचरा होण्यासाठी गटारी नाहीत. त्यामुळे नवीन रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, बांधकाम विभागाकडून चढउताराचे व कुठे रूंद तर कुठे निमुळते रस्ते तयार झाले आहेत. (latest marathi news)

त्यात रस्त्यांवरील पाण्याचा निचरा होत नसल्याने त्या पाण्याला वाट मिळेल तिकडे जात आहे. बहुतांश ठिकाणी तर पाणी जायला मार्गच नसल्यामुळे पाणी साचून राहत आहे. मात्र या वारंवार पाणी साचत राहत असल्यामुळे रस्ते खराब होण्याची भीती भाजपचे सुधाकर जावळे यांनी व्यक्त केली आहे. त्याची दखल घ्यायला संबंधित अधिकारी व विभागाला वेळ मिळत नाही का, असा सवाल त्यांनी केला असून.

भोगावती नदीवरील पुलाच्या कठड्यांना पाण्याचा निचरा होण्यासाठी पाइप टाकून व्यवस्था आहे. मात्र ते पाइप माती, चिखल आणि कचऱ्यामुळे बंद झाले आहे. पालिकेने पुलावरील पाण्याचा निचरा होणारे छिद्रांची साफसफाई केल्यास पुलावर पाणी साचण्याची समस्या नाहीशी होईल. त्यासाठी पालिकेने तत्काळ उपाययोजना कराव्या, अशी मागणी जावळे यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT