Nagjiri Bridge on Juna Sawada Road has started work. esakal
जळगाव

SAKAL Impact : अखेर रावेरच्या ‘नागझिरी’ पुलाच्या कामाला मुहूर्त; अडीच महिन्यात बांधकाम करण्याचे ठेकेदारापुढे आव्हान

सकाळ वृत्तसेवा

SAKAL Impact : येथील नागझिरी नाल्यावरील सुमारे अडीच कोटी रुपये खर्चाच्या पुलाचे बांधकाम रविवारपासून (ता. ३१) सुरू झाले. पुलाच्या कामाची वर्कऑर्डर नसल्याने हे काम सुरू झाल्यावर त्याच दिवशी बंद झाल्याची बातमी ‘सकाळ’ने प्रसिद्ध केली होती. त्यानंतर प्रशासनाने तातडीने कामाची वर्कऑर्डर संबंधित कंत्राटदाराला दिली आहे. (jalgaon SAKAL Impact Finally time for work on Rave Nagziri bridge marathi news)

गेल्या जून महिन्यात सातपुड्यातून वाहत येणाऱ्या नागझिरी नदीला अचानक रात्री आलेल्या जोरदार पुरामुळे शहराच्या जुन्या सावदा रस्ता भागातील नदीवरील पुलाचा काही भाग वाहून गेला आणि त्यातच माजी उपनगराध्यक्ष सुधीर पाटील हे वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पाटील कुटुंबीयांच्या घरी सांत्वनपर भेट देताना आठवडाभरातच या पुलाचे नवीन बांधकाम काम सुरू होईल, अशी घोषणा केली होती.

मात्र त्यानंतर तीन महिन्यांनी ही पुलाचे काम सुरू झालेच नाही. नंतर मंत्री गिरीश महाजन रावेर येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना 'सकाळ'ने त्यांना पुन्हा याबाबतचा प्रश्न विचारला. त्यावेळी श्री. महाजन यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर चर्चा करून आठवडाभरातच काम सुरू होईल, अशी पुन्हा एकदा माहिती दिली. त्यानंतरही या पुलाचे काम सुरू झाले नाही. कारण त्या पुलासाठी आवश्यक असलेली तांत्रिक मंजुरी आणि निधी मंजूर झाला नव्हता, अशी माहिती मिळाली. (latest marathi news)

'सकाळ'ने वारंवार या बातमीचा पाठपुरावा केला. अखेर आचारसंहिता लागण्याच्या आधी या पुलाचे काम सुरू झाले, हे खरे. परंतु वर्कऑर्डर नसल्याने पुन्हा त्या दिवशी सायंकाळीच ठेकेदाराने पूल बांधणीबाबतचे सर्व साहित्य काढून घेऊन काम बंद केले. ‘सकाळ’ने याबाबतची बातमी प्रसिद्ध करतात एकच खळबळ उडाली आणि प्रशासकीय यंत्रणेने कामाची वर्कऑर्डर संबंधित ठेकेदाराला दिली. त्यानंतर कामाची तयारी करीत कंत्राटदराने रविवारपासून (ता. ३१) पूल नव्याने बांधण्याचे काम हाती घेतले आहे.

नागरिकांनी ‘सकाळ’चे मानले आभार

येत्या जून महिन्याच्या मध्यापर्यंत म्हणजे साधारण अडीच महिन्यात या पुलाचे बांधकाम करण्याचे आव्हान आता ठेकेदारापुढे आहे. दरम्यान, रविवारी (ता. ३१) पुलाचे बांधकाम पुन्हा सुरू होताच जुना सावदा रस्ता भागातील नागरिकांनी 'सकाळ'कडे दूरध्वनी करून काम सुरू झाल्याची माहिती दिली आणि या कामाचा सतत पाठपुरावा केल्याबद्दल ‘सकाळ’चे आभारही मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT