जळगाव : सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये दरवर्षीच डेंगी व डेंगीसदृष रुग्णांच्या संख्येत वाढ होत असते. गेल्या काही दिवसांत डेंगीबाधित रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसत असून, त्यासाठी ज्या भागात डेंगीचा रुग्ण बाधित आढळून आला त्या ‘कंटेनर’ क्षेत्रात सर्वेक्षणाचे प्रमाण वाढवून उपाययोजना करण्यावर महापालिकेसह आरोग्य यंत्रणेचा ‘फोकस’ असेल. (SAKAL Impact Municipality action on Dengue update)
‘सकाळ’ने सोमवारच्या अंकात जळगाव शहरासह जिल्ह्यातील डेंगी बाधित तसेच डेंगीसदृष रुग्णांची वाढती संख्या, त्यासंबंधी होत असलेल्या उपाययोजना, त्याती कमतरता व त्रुटी याचा आढावा घेणारे विशेष पान ‘डेंगीचा डंख’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध केले. जळगावकरांनी ‘सकाळ’च्या वृत्तांकनाचे कौतुक व स्वागत करत आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तर या वृत्ताची दखल घेत महापालिकेचा आरोग्य विभाग, अन्य आरोग्य यंत्रणाही कामाला लागल्या आहेत.
सर्वेक्षण वाढविणार
‘सकाळ’च्या वृत्ताची दखल घेत महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी यासंदर्भात उपाययोजनांची माहिती दिली. विशेषत: पावसाळ्यात महापालिकेकडून दरवर्षी डेंगी व अन्य साथरोगांचा प्रसार रोखण्याबाबत उपाययोजना राबविल्या जातात. गेल्या तीन महिन्यांपासून शहरात डेंगी व डेंगीसदृश लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी केली जात आहे. सप्टेंबरमध्ये पावसाळा ‘पिक’वर असतो.
शिवाय, पावसाळ्याचा अंतिम टप्पा असतो. अशा वेळी विविध भागात पाणी साचण्याचे प्रमाण अधिक असते. घरात, अंगणातही छोट्या मोठ्या वस्तूंमध्ये पाणी साचलेले असते.. त्यात व टक्यांमधूनही एडिस इजिप्ती डासाचा प्रादुर्भाव आढळून येतो. अशा ठिकाणी प्रभावी उपाययोजना राबविल्या जात आहेत. याचअंतर्गत शहरात १० पथकांद्वारे सर्वेक्षण सुरू असून, डेंगीचे प्रमाण पाहता ही पथके वाढविण्यात येतील, त्याद्वारे सर्वेक्षणाची वारंवारिताही वाढविण्यात येईल. (latest marathi news)
आशासेविकांची नियुक्ती
महापालिकेत आशासेविकांची व अन्य पदे रिक्त होती. ती भरण्यावर भर दिला जात आहे. दोन दिवसांपूर्वीच ९० आशा सेविकांची भरती करून त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले आहेत. पर्यवेक्षकही नेमले आहेत. त्याद्वारे पथकांची संख्या वाढवून सर्वेक्षण वाढविण्यात येईल. डेंगीचा रुग्ण आढळून आलेल्या भागाला ‘कंटेनर’ क्षेत्र म्हणून गणले जाते. या क्षेत्रात घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येते. त्याचे प्रमाणही वाढवले जाईल. तसेच या भागात धूरफवारणीही करण्यात येत असून, आवश्यकता वाटल्यास त्याचे प्रमाणही वाढविण्यात येईल, असे आयुक्त श्री. ढेरे म्हणाले.
तपासणी, स्क्रीनिंग वाढविणार
महापालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनीही महापालिकेकडून सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा सादर केला. मनपाच्या रुग्णालयांमध्ये डेंगीसदृश रुग्ण व त्यासंबंधी लक्षणे आढळून येत असलेल्या रुग्णांच्या चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. दिवसभरात अशी लक्षणे असलेले शंभरावर रुग्ण येतात, त्या प्रत्येकाची चाचण करण्याची गरज नाही. मात्र, आवश्यकता वाटल्यास स्क्रीनिंगही वाढविण्यात येईल, असे ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.