Ongoing work on the consolation shed at the cemetery.  esakal
जळगाव

SAKAL Impact News : पहूर कसबे येथे अखेर स्मशानभूमीतील सांत्वन शेडचे काम सुरू

Jalgaon News : लवकरच हे काम पूर्ण होऊन शोकाकुल नातेवाईक, आप्तांना दिलासा मिळणार असल्याचे आंदोलक विक्रम घोंगडे यांनी बोलताना सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

पहूर (ता. जामनेर) : पहूर कसबे येथील हिंदू स्मशानभूमीतील रखडलेले सांत्वन शेडचे काम ग्रामपंचायत सदस्य विक्रम पंडित घोंगडे यांच्या नेतृत्वाखाली पुकारल्या गेलेल्या भिख मांगो आंदोलनानंतर अखेर सुरू झाले असून, लवकरच ते पूर्णत्वास येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. याविषयी 'सकाळ'ने वाचा फोडून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले होते. (work of consolation shed in cemetery at Pahoor Kasbe started)

पहूर कसबे येथे वाघूर नदीच्या तीरावर स्मशानभूमी असून, या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आलेल्या शोकाकुल नातेवाईक तसेच आप्तस्वकियांना बसण्यासाठी १५ व्या वित्त आयोगातून जिल्हा परिषदेमार्फत ७ लाख रुपये निधीचे सांत्वन शेड मंजूर झालेले आहे. परंतु हे काम अर्धवट स्थितीत रखडल्याने पहूर कसबे ग्रामपंचायतीचे सदस्य विक्रम पंडित घोंगडे यांनी भिख मांगो आंदोलन पुकारले होते.

या आंदोलनाची दखल घेत अखेर जामनेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश पवार यांनी संबंधित ठेकेदार व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याविषयी लेखी स्वरूपात पत्रव्यवहार करून ठेकेदारास हे काम महिनाभरात पूर्ण करण्याचे आदेश दिलेले होते. तथापि एका महिन्यात काम पूर्ण झाले नसले तरी सुरवात मात्र झालेली आहे. लवकरच हे काम पूर्ण होऊन शोकाकुल नातेवाईक, आप्तांना दिलासा मिळणार असल्याचे आंदोलक विक्रम घोंगडे यांनी बोलताना सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT