Sant Muktabai Rampalkhi of Sri Ram Mandir Sansthan left for Pandharpur from Appa Maharaj Samadhi on Friday.
Sant Muktabai Rampalkhi of Sri Ram Mandir Sansthan left for Pandharpur from Appa Maharaj Samadhi on Friday. esakal
जळगाव

Sant Muktabai Rampalkhi : आदिशक्ती मुक्ताबाईच्या नामाने दुमदुमली जळगावची पंढरी; श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान

सकाळ वृत्तसेवा

Sant Muktabai Rampalkhi : श्री संत मुक्ताबाई रामपालखीचे वटपौर्णिमेस आप्पा महाराज समाधिस्थळ येथून श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी यात्रेसाठी प्रस्थान झाले. आप्पा महाराज समाधी मंदिर येथे गुरुवारी मुक्कामी राहिल्यानंतर शुक्रवारी (ता. २१) वटपौर्णिमेला सकाळी आठला पालखी पंढरपूरकडे निघाली. तत्पूर्वी पहाटे प्रभू श्रीराम, श्री संत मुक्ताईंच्या पादुका व श्री सद्गुरू आप्पा महाराजांच्या समाधीचे भजन पूजन, अर्चन, प्रस्थानाचे अभंग आरती झाली. ( Sant Muktabai Palkhi began for pandharpur with devotees )

पायीवारीस शुभेच्छा देण्यासाठी जळगावचे भाविक तसेच संस्थानचे विश्वस्त मंडळी, यासोबत आमदार राजूमामा भोळे, जनता बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने, क्षुधा शांती सेवा संस्थेचे संजय बिर्ला, केशव स्मृती प्रतिष्ठानचे डॉ. विवेकानंद जोशी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. विवेकानंद प्रतिष्ठानचे विद्यार्थी ‘याचि देही याचि डोळा’ वारीचा अनुभव घेण्यासाठी उत्साहाने या पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी झाले होते.

ज्ञानोबा, तुकोबा व मुक्ताईंच्या नामघोषात पालखीचे पंढरीकडे प्रस्थान पालखी होत असताना वाटेत श्री कंवरराम चौक येथे भक्ती-शक्ती सोहळा झाला. या वेळी पालखी सोहळाप्रमुख मंगेश महाराज यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. पंचमुखी हनुमान मंदिर, सिंधी कॉलनी, डी मार्टमार्गे मेहरूण शिवारातील शिवाजी उद्यानाजवळील श्री संत मुक्ताई पादुका मंदिर येथे दुपारी अभंग, आरती होऊन अकराला पालखी शिरसोलीकडे मार्गस्थ झाली.

याठिकाणी पालखी मुक्कामी

शिरसोली, वावडदा, दुसखेडे, पाचोरा, लोहटार, कजगांव, रांजणगाव, मुंडवाडी, चापानेर, बोरगाव, खुलताबाद, तु. खराडी, अमळनेर प्रवरासंगम, नेवासे, वडाळा, जेऊर, नगर, रूईछत्तीसी, मिरजगांव, करमाळा, मांगी, करमाळा, स्टेशन जेऊर, वांगी क्र. १, टेंभुर्णी, करकंब येथे मुक्कामी राहील. (latest marathi news)

मुक्ताई-निवृत्तिनाथ भेट

पवारवस्तीत १६ जुलैस पालखी सोहळा चिंचोली (ता. पंढरपूर) येथे दर वर्षाप्रमाणे परंपरेने श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून आलेल्या संतश्रेष्ठ बंधू निवृत्तिनाथ महाराज व आदिशक्ती ब्रह्मचित्कला श्री संत मुक्ताबाई या बहीण-भावाचा भेट दर्शन सोहळा होईल. वाखरी येथे महाराष्ट्रातून विविध संतांच्या पालख्या एकत्र येतात. या सोहळ्यात ही पालखी सहभागी होईल. तेथून श्री विठ्ठल, ज्ञानोबा, तुकाराम व श्रीमुक्ताईंच्या नामस्मरणात श्रीक्षेत्र पंढरपूर येथे प्रवेश करेल.

यांचा पूर्णवेळ सहभाग

पालखीचे सोहळ्याचे नेतृत्व वंशपरंपरेने श्री संत आप्पा महाराजांचे पाचवे वंशज व विद्यमान गादीपती मंगेश महाराज करीत असून, सोबत नंदू शुक्ल गुरुजी, अरुण धर्माधिकारी, दत्तुबुवा मिस्तरी, श्रीराम महाराज, पोपट माळी, सुपडू तेली, सखाराम महाराज, निंबा जगताप, संभाजी पाटील, दिलीप कोळी, कारभारी गव्हाणे, खंडू तांबट, बाळू कोळी, बापू सोनार, जानकीराम भोई, फकिरा आदी प्रवचनकार व कीर्तनकार मंडळी आहेत.

पालखीसोबत सुविधा

पालखीसोबत महाराष्ट्र शासन, जळगाव जिल्हा परिषदेतर्फे वारकरी मंडळींच्या आरोग्य सुविधेसाठी दर वर्षाप्रमाणे यंदाही वैद्यकीय पथक, जीपगाडीसह पिण्याच्या पाण्याचा टँकर राहील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari 2024: पावसाच्या सरींच्या साथीने अवघा वैष्णवांचा मेळा पुण्यनगरीत दाखल! दर्शनासाठी लोटला भाविकांचा जनसागर

Devendra Fadnavis: महायुतीमध्ये नेमकं चाललंय काय? अजित पवारांच्या मंत्र्याला फडणवीसांचे भाजप प्रवेशाचे निमंत्रण

T20 World Cup 2024: रोहितच्या रोबो वॉकचा असा शिजला होता प्लॅन, ICC च्या Video ने उघडलं रहस्य

Vidhan Sabha Election: महायुतीत कोणाला किती जागा? भाजपच्या बड्या नेत्याने सांगितला जागा वाटपाचा फॉर्म्युला

INDIA: अयोध्या जिंकणारा खासदार ठरणार जायन्ट किलर? लोकसभेच्या उपाध्यक्ष पदासाठी 'इंडिया'चा मोठा डाव

SCROLL FOR NEXT