Cotton Crop esakal
जळगाव

Jalgaon Cotton Crop Crisis: कापूस बियाणांच्या तुटवड्याने शेतकऱ्यांची लूट! कृषी विभाग पथके नावालाच; कापूस बियाण्यांचा तुटवडा

Jalgaon News : कृषी विभागातील पथकांनी धाडी टाकून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबवावी अशी मागणी होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

चोपडा : खरीप पेरणीसाठी बी-बियाणांच्या खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी वाढली असताना, कृषी सेवा केंद्रांना विशिष्ट बियाणे कंपन्यांची बियाणे मिळत नसल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, काही ठिकाणी बियाणांची चढ्या दराने विक्री सुरु असून, ८६० रुपयांची बॅग दीड ते दोन हजारांपर्यंत विक्री होते पण बिल मात्र ८६० रुपयांचे दिले जात असल्याच्या तक्रारी आहे. कृषी विभागातील पथकांनी धाडी टाकून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबवावी अशी मागणी होत आहे. (Jalgaon Scarcity of cotton seeds)

खरीप हंगामात मुबलक प्रमाणात बी-बियाणे, खते उपलब्ध असल्याचे कृषी विभागाने सांगितले. मात्र, प्रत्यक्षात बियाणे उत्पादक कंपन्यांनी नोंदवलेल्या मागणीच्या प्रमाणात जेमतेम २५ टक्के बियाणांचा पुरवठा केला आहे. त्यामुळे पहिल्या दोन दिवसांतच संपूर्ण बियाणांची विक्री झाल्याने शेतकऱ्यांना हव्या असलेल्या बियाणांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

काही निवडक खासगी कंपन्यांच्या वाणाला शेतकरी पसंती देत असल्याने या कंपन्यांच्या बॅगचे भाव दुकानदारांनी वाढवले आहेत. एका बॅगमागे दीड ते दोन हजार रुपये अधिकचे घेतले जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. खरीप हंगामाच्या पहिल्याच आठवड्यात बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांची धावपळ होत आहे.बाजारात राशी ६५९,जादू, सुपरकॉट, प्राइम,यासह अन्य कंपन्यांचे बियाणे उपलब्ध होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

दुसरे कंपनी चे बियाणे घ्या

विशिष्ट कंपनीचे बियाणे मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहे. शेतकऱ्यांच्या माथी दुसरे कंपनी चे बियाणे विक्री करून दिले जात आहे. इतर कंपन्यांचे पाकीट घेणे बंधनकारक केले जात आहे. ते न घेतल्यास दुप्पट किंमत मोजावी लागत आहे. हवे असलेले बियाणे मिळत नाही. (latest marathi news)

पथके नावालाच

कृषी विभागाने बोगस बियाणे,अव्वाच्या सव्वा भावात विक्री,बियाणे चा कृत्रिम तुटवडा यासाठी जिल्ह्यात पथके कार्यरत आहेत मात्र ही पथके नावालाच असल्याचे दिसून येत आहे.

"बियाणे उपलब्ध नाही कपाशीचे बियाणे घेण्यासाठी दुकानावर गेलो असताना राशी ६५९,सुपरकॉट,हे बियाणे मिळाले नाही. नाइलाजास्तव राजमुद्रा,जय हो,राशी७९७, निओ या कंपन्यांचे बियाणे घ्यावे लागले. हवे असलेले बियाणे मिळत नाही."

- मुकेश पाटील, शेतकरी, चहार्डी

"व्यापाऱ्यांनी त्यांच्या दुकानात उपलब्ध बियाणांचा फलक बाहेर लावणे आवश्यक आहे. जर फलक लावला नाही तर कठोर कारवाई करण्यात येईल. शिवाय शेतकऱ्यांनी जागृत होणे अपेक्षित आहे.बिल जितके असेल तेवढीच रक्कम द्यावी, उपलब्ध बियाणे घेऊन शेतकऱ्यांनी १ जून पासून लागवड करावी"- तालुका कृषी अधिकारी, चोपडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT