Employees cleaning the school premises on Friday. esakal
जळगाव

Jalgaon News : धरणगाव तालुक्यात शाळांच्या इमारती सुस्थितीत

Jalgaon : जिल्हा परिषदेच्या ९१ शाळा व इतर माध्यमांच्या ६९ अशा एकूण १६० शाळा आहेत. बऱ्याच गावांत शाळांच्या इमारती बऱ्यापैकी आहेत.

डी. एस. पाटील

Jalgaon News : शहरासह तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ९१ शाळा व इतर माध्यमांच्या ६९ अशा एकूण १६० शाळा आहेत. बऱ्याच गावांत शाळांच्या इमारती बऱ्यापैकी आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला डागडुजी व तयारी करण्याची फारशी गरज नाही. ‘आरटीई ऍक्ट २००९’नुसार सक्तीचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे, यासाठी शासनातर्फे अनेक योजना राबविल्या जातात. समग्र शिक्षण अभियानांतर्गत मोफत पाठपुस्तके तालुकास्तरावर आज शनिवारी (ता.१५) सर्व शाळांमध्येही विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली. ()

धरणगाव तालुक्यात पहिली ते आठवी जिल्हा परिषद व खासगी अनुदानित, उर्दू माध्यम अशा सर्व शाळा मिळून १७ हजार २७७ पुस्तकांची मागणी केली होती. त्यानुसार १०० टक्के पुस्तके प्राप्त झालीत. तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शाळांना व विद्यार्थ्यांनाही पुस्तके वाटप झालीत. तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांत पटसंख्यानुसार शिक्षक कार्यरत आहेत, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले यांनी ‘सकाळ’ला दिली.

पटसंख्येनुसार शिक्षक असल्याने शिक्षकांची कमतरता नाही. शाळा सुरू होण्याच्या दोन दिवस आधीच तालुक्यात सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांची शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यशाळा झाली. त्यात पावसाच्या व शाळा पूर्वतयारीनिमित्त शाळांचे स्वच्छता स्वच्छता करण्याची सूचना दिली होती. त्यानुसार स्वच्छता करून विद्यार्थ्यांचं संपूर्ण तालुक्यात शनिवारी वाजतगाजत स्वागत करण्यात आले. (latest marathi news)

प्रत्येक विद्यार्थ्याला गुलाब पुष्प देऊन सन्मानाने शाळेत प्रवेश दिला. पाठ्यपुस्तके, गणवेश व मध्यान भोजनात मिष्टान्न देण्यात आलं. तालुक्यातील काही शाळांत सळा व रांगोळ्यांनी सजविण्यात आले होते. विद्यार्थ्यांसाठी एखाद्या दालनात फुगे, पताका लावून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. काही ठिकाणी प्रभातफेरीही काढण्यात आली.

''धरणगाव तालुक्यात विद्यार्थी, शिक्षक व पालकांतही शाळा सुरू झाल्याने उत्साहाचे वातावरण होते. विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके वाटप करण्यात आली. मिष्टान्न भोजनही देण्यात आले. तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व इतर माध्यमांच्या अनुदानित शाळांत शंभर टक्के पुस्तके वाटप झाली आहेत. त्यानुसार आज शनिवारी पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या शाळांत शिक्षकांची संख्याही पटसंख्येनुसार आहे. इमारत डागडुजी, स्वच्छतेबाबतच्या सूचना शाळा सुरू होण्यापूर्वीच शिक्षकांना दिल्या होत्या. त्यानुसार स्वच्छता करण्यात आली होती.''- डॉ. भावना भोसले, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, धरणगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT