majhi shala sundar shala initiative  esakal
जळगाव

Jalgaon News : ‘मुख्यमंत्री सुंदर शाळा’ अभियानाचा राज्यात 5 पासून दुसरा टप्पा

Jalgaon : राज्यात ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचा पहिला टप्पा राबवला गेला.

सकाळ वृत्तसेवा

ॲड बाळकृष्ण पाटील : सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : राज्यात ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचा पहिला टप्पा राबवला गेला. त्यात प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या शाळांना बक्षिसांचे वितरणही झाले. पहिल्या टप्प्यातील विविध उपक्रमात राज्यातील सुमारे दोन कोटी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. काही उपक्रमांची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झाली आहे. आता या अभियानाचा दुसरा टप्पा राज्यात राबविण्यात येणार असून, ५ ऑगस्टपासून ते ४ सप्टेंबरपर्यंत त्याची अंमलबजावणी होणार आहे. ( Second phase of cm sundar shala campaign in state )

त्यानंतर त्याचे मूल्यांकन होऊन राज्य, विभाग व जिल्हास्तरीय बक्षीस जाहीर करण्यात येतील. राज्यस्तरीय पहिले बक्षीस ५१ लाख रुपये असून, द्वितीय बक्षीस ३१ लाख, तर तृतीय बक्षीस २१ लाख रुपयांचे आहे. विभागवार बक्षिसेही देण्यात येणार आहेत. त्यात विभागीय स्तरावर प्रथम येणाऱ्या शाळेस २१ लाख रुपये, द्वितीय येणाऱ्या शाळेस १५ लाख, तर तृतीय येणाऱ्या शाळेस ११ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. (latest marathi news)

जिल्हास्तरावर प्रथम येणाऱ्या शाळेस अकरा लाख, द्वितीय येणाऱ्या शाळेत पाच लाख व तृतीय येणाऱ्या शाळेस तीन लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तालुका स्तरावर प्रथम तीन लाख, द्वितीय दोन लाख, तर तृतीय येणाऱ्या शाळेस एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. त्या रकमेतून त्या-त्या शाळांमध्ये विविध सुविधा करण्यात येणार आहे. एकूण बक्षिसांची रक्कम व अभियान राबविण्यासाठी ८६.७२ कोटी रकमेच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

शासकीय स्तरावर समितीमार्फत गुण देऊन क्रमांक निवडले जातात. त्यात पायाभूत सुविधा, शासनाच्या ध्येयधोरणांची अंमलबजावणी, शैक्षणिक गुणवत्ता, अशा वेगवेगळ्या निकषांमधून शाळांची निवड केली जाते. त्यात जिल्हा परिषदेच्या शाळांचा एक गट, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खासगी, उर्वरित व इतर व्यवस्थापनाच्या शाळा, अशा दोन गटांत विभागणी करण्यात येते. त्यातून निवड करून बक्षीस जाहीर केले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT