A truck overturned in a drain while avoiding a pothole on Shendurni (Jamner) road. esakal
जळगाव

Jalgaon Accident: शेंदुर्णी-पहूर रस्त्यावर खड्ड्यांमुळे ट्रॅक उलटला! सुदैवाने जीवितहानी टळले; अपघातांची मालिका सुरूच

Latest Accident News : या अपघातात जीवित हानी झालेली नाही. मात्र ट्रकचे नुकसान झाले. या रस्त्यावरील खड्ड्यांची दोन, तीन महिन्यात डागडुगी करूनही खड्डे पुन्हा जैसे थे आहेत.

सकाळ वृत्तसेवा

शेंदुर्णी (ता. जामनेर) : पहूरवरून शेंदुर्णीकडे येत असलेला ट्रक खड्डा चुकविताना थेट रस्त्यालगत असलेल्या नाल्यात उलटला. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झालेली नाही. मात्र ट्रकचे नुकसान झाले. (Shendurni Pahoor road truck overturned)

पहूरवरून ट्रॅक (एमएच ४१, एव्ही ३५७६) शेंदुर्णीकडे जात असताना रस्त्यामधील खड्डा चुकविताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक जवळच असलेल्या नाल्यात उलटला. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. रस्त्यावरील खड्ड्यांची दोन, तीन महिन्यात डागडुगी करूनही खड्डे पुन्हा जैसे थे आहेत.

अर्धा रस्ता चांगला आणि अर्धा खराब असल्यामुळे अचानक समोर खड्डा आल्याने वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडते. खड्डा चुकविण्याच्या नादात समोरून येणाऱ्या वाहनावर आदळण्याची किंवा वाहन रस्त्याच्या खाली जाण्याची शक्यता जास्त असते. (latest marathi news)

रात्रीच्या वेळी तर समोरील वाहनांच्या लाईटाच्या प्रकाशामुळे खड्डे दिसतच नाहीत. वाहनधारक आपला जीव मुठीत धरून प्रवास करीत असतो. नागरिक या रस्त्यावरील पडलेले मोठमोठ्या खड्ड्यांनी बेजार झाले असून, अनेकांना अपघात होऊन खड्ड्यांमुळे दुखापत झाली आहे.

एखादा मोठा अपघात होऊन एखाद्याचे प्राण गेल्यावरच प्रशासनाला जाग येईल का? असा सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत. तरी प्रशासनाने त्वरीत योग्य पद्धतीने खड्डे बुजवावे व संभाव्य धोका टाळावा, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Voting: पिपाणीने पुन्हा केला तुतारीचा गेम! वळसे पाटील थोडक्यात वाचले; पवारांच्या ९ बड्या नेत्यांना कसा बसला फटका?

Mobile Charging Tips : कितीही वेळ मोबाईल वापरा चार्जिंग संपणारच नाही, सोपी ट्रिक बघाच

Devendra Fadanvis: ‘महाराष्ट्र नायक’ फडणवीसांनाच मुख्यमंत्री करा, भाजपची जोरदार Lobbying

Utpanna Ekadashi 2024: 26 कि 27 नोव्हेंबर कधी साजरी केली जाणार उत्पन्न एकादशी? जाणून घ्या काय करावे अन् काय नाही

Latest Maharashtra News Updates : उद्धव ठाकरे आमदारांकडून घेणार प्रतिज्ञापत्र; पुन्हा पक्ष फुटीची भीती

SCROLL FOR NEXT