Jalgaon Shut down teacher recruitment portal system  sakal
जळगाव

जळगाव : शिक्षक नियुक्ती पोर्टलप्रणाली बंद करा

जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्थाचालक बैठकीत मागणी

सकाळ वृत्तसेवा

चोपडा : राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील नोकरभरतीचा अधिकार हा खासगी शिक्षण संस्थांचा घटनात्मक अधिकार आहे. यावर अतिक्रमण करून शासनाने सुरू केलेली पवित्र पोर्टल प्रणाली ही तातडीने रद्द करण्याचा शासन निर्णय पारीत करावा, अशी मागणी जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्थाचालक बैठकीत करण्यात आली.

जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्थाचालक या संघटनेची कार्यकारी मंडळाची सभा कार्याध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे- खेवलकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. १) भगीरथ के. सोमाणी माध्यमिक विद्यालय पिंप्राळा येथे झाली. त्यावेळी बैठकीत ठराव करण्यात आला.

बैठकीत वेतनेतर अनुदान सातव्या वेतन आयोगानुसार तातडीने द्यावे, कोविड १९ मुळे शाळा बंद असल्याने अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले नाहीत व म्हणून शैक्षणिक वर्ष २०२०-२१ नुसार संच मान्यतेत ज्या प्रमाणे सवलत देण्यात आलेली होती, त्याचप्रमाणे २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता मिळावी.

या शैक्षणिक वर्षात कोणीही शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना अतिरिक्त घोषित करण्यात येऊ नये. दुरुस्तीसाठी प्रलंबित असलेली संच मान्यतेची प्रकरणे त्वरित दुरुस्त करून निकाली काढावी, शैक्षणिक संस्थाना वीज व पाणी वापराची बिले घरगुती दराने आकारणी करून सुधारित शासन आदेश पारीत करावा तसेच इमारत कर माफ करण्यात यावा.

शालार्थ मंजुरीचे अधिकार स्थानिक पातळीवर शिक्षणाधिकारी यांना देण्यात यावे. अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्यांना तातडीने मान्यता देऊन वेतन सुरू करण्यात यावे, अशा मागण्या या सभेत करण्यात आल्या. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी संघटना पातळीवर पाठपुरावा सातत्याने केलेला असूनही शासनाने मागण्या पूर्ण करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसल्यामुळे या मागण्यांच्या पूर्ततेसाठी संस्थाचालक महामंडळाने येत्या बोर्डाच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे.

या निर्णयास जिल्हा संस्थाचालक संघटनेने देखील पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच स्थानिक पातळीवरील विविध प्रश्नांसाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक व प्राथमिक) यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील संस्थाचालकांची लवकरच तक्रार निवारण सभा आयोजित केली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या सभेस संघटनेचे अध्यक्ष जयवंत पाटील, उपाध्यक्ष व्ही. टी. जोशी, जीवन खिंवसरा, सरचिटणिस संजय सोमाणी, चिटणिस शकिल पटेल, उपकार्याध्यक्ष महेंद्र मांडे, सदस्य शैलेश राणे, जी. एम. महाजन, डॉ. नरेंद्र कोल्हे, निखिल मुंदडा, नीलेश बारी, विजय कोटेचा, घनःश्याम बडगुजर, मधुकर पवार, राजेंद्र महाजन, बाळासाहेब देशमुख, लिपिक मनोज वाघ आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT