Mentor with trained officers to prevent child marriage. esakal
जळगाव

Jalgaon Child Marriage : बालविवाह रोखण्यासाठी 75 अधिकाऱ्यांना विशेष ट्रेनिंग!

Jalgaon News : जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण २८ टक्के आहे. ते कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण २८ टक्के आहे. ते कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दलांतर्गत ७५ अधिकाऱ्यांची टीम बालविवाह रोखण्यासाठी तयार केली आहे. त्यांना नुकतेच विशेष प्रशिक्षण देण्यात आले. दरम्यान, जानेवारी २०२३ ते जून २०२४ दरम्यान ८० बालविवाह रोखण्यात आले आहेत. (Jalgaon Child Marriage)

बालविवाह मुक्त जिल्हा करण्यासाठी योग्य नियोजन, अंमलबजावणी व निर्णय या कृती दलामध्ये घेण्यात येतात. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हाधिकारी प्रसाद यांच्या जिल्हा कृती दल बैठकीतील सूचनांनुसार सक्षम बालविवाह निर्मूलन कार्यक्रमांतर्गत महिला व बालविकास विभाग, युनिसेफ, एसबीसी-३ व जिल्हा प्रशासनातर्फे आरोग्य, पंचायत.

शिक्षण महिला व बालकल्याण आणि जिल्हा महिला व बालविकास विभागमधील तालुकास्तरीय, तसेच क्लस्टरमधील अधिकारी व कर्मचारी, अशा ७५ अधिकाऱ्यांना बालविवाह निर्मूलन चॅम्पियन्स प्रशिक्षण हॉटेल फोर सिझन क्रिएशनमध्ये देण्यात आले. जिल्हा समूह संघटक राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान प्रवीण जगताप, पंचायत, महिला बालकल्याण, शिक्षण, जिल्हा महिला व बालविकास विभागांचे प्रतिनिधी.

एसबीसी ३ प्रकल्प प्रमुख नंदू जाधव, वरिष्ठ प्रकल्प समन्वयक कृपाली बिडये, सोनिया हंगे यांच्या हस्ते प्रशिक्षणाचे उद्‌घाटन झाले. प्रशिक्षणामध्ये तालुकानिहाय बालविवाहाची कारणे, महाराष्ट्रातील बालविवाहांचे प्रमाण, बालविवाह निर्मूलनासाठी सुरू असलेल्या ‘सक्षम’ प्रकल्पाविषयी माहिती, बालकांचे हक्क, बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६, बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५. (latest marathi news)

पोक्सो कायदा २०१२, विभागनिहाय नियुक्त केलेल्या ईसीएम चॅम्पियन्स यांची भूमिका व जबाबदारी, त्यामध्ये बालविवाह निर्मूलनासाठी कार्यान्वय योजना आखून त्याप्रमाणे नियोजन करणे, साप्ताहिक देखरेखीचे अहवाल तयार करणे व त्यांचा नियमितपणे आढावा घेऊन कार्यालयास सादर करणे, बालविवाह निर्मूलन कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यांचा अहवाल नियमितपणे गुगल लिंकमध्ये भरणे.

जिल्हा कृती आराखड्यासाठी सर्व विभागांचे सहाय्य व नियोजन, केलेल्या कार्यानुसार जिल्हा कृती दल बैठकीत सादरीकरण अहवाल तयार करणे आदी गोष्टींची माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणासाठी प्रमुख प्रशिक्षक म्हणून एसबीसी-३ चे बालविवाह निर्मूलन प्रकल्पप्रमुख नंदू जाधव.

वरिष्ठ प्रकल्प समन्वयक सोनिया हंगे, कृपाली बिडये यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. एसबीसी-३ वरिष्ठ प्रकल्प समन्वयक विकास कांबळे, प्रकल्प समन्वयक श्रीकांत भोरे, सहाय्यक प्रकल्प समन्वयक रुचिका इंगळे, कम्युनिकेशन समन्वयक रूचिका अहिरे यांनी प्रशिक्षण यशस्वितेसाठी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT