Jalgaon News : जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस लागवडीसाठी २७ लाख ९२ हजार बियाणे पाकिटांची आवश्यकता आहे. लागवडीसाठी पुरेसे बियाणे जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे. खरीप हंगामात जिल्ह्यात प्रतिबंधित एचटीबीटी या कापूस वाणाची लागवड व सीमेलगतच्या राज्यातून होणारी छुपी विक्री रोखण्यासाठी जिल्हास्तरीय भरारी पथके व तालुकास्तरीय भरारी पथकांची निर्मिती करून मोहीम स्वरूपात कृषी केंद्रांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के. एम. तडवी यांनी दिली. ( Squad deployed to stop sale of HTBT )
बीटी कापसाच्या बियाण्यामध्ये परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशील असणारे एचटीबीटी कापूस बियाणे विक्री करण्यास ‘जीईएसी’ यांनी परवानगी दिलेली नाही. तालुक्यातील कृषी मित्र, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, विस्ताराधिकारी, कृषी अधिकारी, गावातील पोलिसपाटील, प्रगतिशील शेतकरी यांच्याशी जिल्ह्यातील सर्व गुणनियंत्रण निरीक्षक संपर्कात असून, असा प्रकार आढळल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.
एचटीबीटी या अवैध कापूस बियाण्यापासून पर्यावरणास असलेला धोका, जमिनीची सुपिकता नष्ट होण्याचा धोका, नागरिकांच्या अन्न सुरक्षेला असलेला धोका विचारात घेता, खरीप हंगामात कोणत्याही परिस्थितीत शेतकरी बांधवांनी या वाणांची लागवड करू नये, अशा प्रकारचे कापूस बियाणे विक्री करताना आढळून आल्यास संबंधितांवर कृषी विभागामार्फत पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ च्या कायद्यान्वये पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येईल.
कापूस खरेदीची बिल घ्या!
जिल्ह्यात या वाणाचे अवैध व विनाबिलाने खरेदी करू नये. अशा कापूस वाणांची अनधिकृतपणे विक्री करीत असल्याचे दिसून आल्यास दूरध्वनी ०२५७-२२३९०५४ व मोबाईल क्रमांक ९८३४६८४६२० वर माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तडवी यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.