Jalgaon SSC Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाइन जाहीर झाला. दहावीच्या यंदाच्या निकालातही मुलीच आघाडीवर असून, जिल्ह्याचा एकूण निकाल ९४.८८ टक्के आहे. या निकालात ९६.२० टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. (Jalgaon SSC Result 10th exam girls leading)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी (ता. २७) दुपारी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. यात नाशिक विभागाचा एकूण निकाल ९४.८७ टक्के लागला असून, नाशिक विभागातून नाशिक जिल्ह्यानेच बाजी मारली.
जळगाव जिल्हा तिसऱ्या स्थानावर आहे. जिल्ह्यातून यंदा एकूण ५५ हजार ८८५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ५३ हजार २८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, जळगाव जिल्ह्याचा निकाल ९४.८८ टक्के लागला आहे. (latest marathi news)
यंदाही मुलीच अव्वल
जळगाव जिल्ह्यातून यंदा ३१ हजार ५२९ मुलांमधून २९ हजार ५९६ मुले उत्तीर्ण झाले असून, त्यांची टक्केवारी ९३.८६ टक्के आहे; तर २४ हजार ३५६ मुलींपैकी २३ हजार ४३२ उत्तीर्ण झाल्या असून, उत्तीर्ण झालेल्या मुलींची टक्केवारी ९६.२० इतकी आहे. जळगाव जिल्ह्यातील एकूण निकालात २२ हजार ८२७ विद्यार्थी डिस्टिंक्शनमधून उत्तीर्ण झाले आहेत.
तालुकानिहाय निकाल
अमळनेर (९७.०५ टक्के), भुसावळ (९५.२९), बोदवड (८८.७५), भडगाव (९५.०२), चाळीसगाव (९४.१८), चोपडा (९४.७६), धरणगाव (९६.२५), एरंडोल (९३.८४), जळगाव (९३.८२), जामनेर (९३.५९), मुक्ताईनगर (९२.९९), पारोळा (९५.४१), पाचोरा (९१.६१), रावेर (९४.५०), यावल (९२.६५); तर जळगाव महापालिका क्षेत्राचा ९६.९९ टक्के इतका निकाल लागला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.