Raksha Khadse, MP and Minister of State for Sports and Youth Welfare giving a statement to the Minister of State for Civil Aviation Ram Mohan Naidu regarding the flight service from Jalgaon. esakal
जळगाव

Jalgaon Airline Service : तिरुपती, इंदूरसह अहमदाबादला जळगावहून विमानसेवा सुरू करा

Jalgaon News : जळगावहून तिरुपती, इंदूरसह अहमदाबादला विमानसेवा सुरू करावी, तसेच मुंबई व पुणे विमानसेवेची प्रवाशांच्या सोयीनुसार सकाळ व सायंकाळ वेळ करावी, अशी मागणी राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जळगावहून तिरुपती, इंदूरसह अहमदाबादला विमानसेवा सुरू करावी, तसेच मुंबई व पुणे विमानसेवेची प्रवाशांच्या सोयीनुसार सकाळ व सायंकाळ वेळ करावी, अशी मागणी केंद्रीय क्रीडा-युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री राममोहन नायडू यांच्याकडे केली.

याबाबत त्यांची भेट घेत सविस्तर निवेदन देत त्यांनी वरील मागणीची गरज विशद केली. राज्यमंत्री खडसे म्हणाल्या, जळगाव विमानतळ येथे आयएफआर-ऑल वेदर ऑपरेशन, लॉ व्हिजीबिलिटी व नाइट लॅन्डिंग अशा स्थानिक विमान वाहतुकीसाठी आवश्यक सर्व सुविधांनी परिपूर्ण आहे.

जळगावहून सध्या मुंबई व पुणेसाठी आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा सुरू आहे. परंतु येथून प्रवास करणारे व्यापारी व नागरिकांच्या मागणीनुसार त्यांच्या सोयीसाठी. (latest marathi news)

तसेच परिसरातील अधिकचे प्रवासी आकर्षित करण्यासाठी, पुण्यासाठी सायंकाळी व मुंबईसाठी सकाळी दररोज विमानसेवा चालू करण्यात यावी. या मागणीवर मंत्री नायडू यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच दोन्ही मागण्यांवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT