Jalgaon Crime esakal
जळगाव

Jalgaon Crime : धावत्या रिक्षात महिलेच्या पर्सवर डल्ला; 40 हजारांच्या दागिन्यांसह रोकड लंपास

Jalgaon Crime : महिलेची २० हजार रुपयांची रोकड आणि २० हजार रुपये किमतीचे सोन्‍याचे झुमके ठेवलेली पर्स चालत्या रिक्षातून चोरट्याने लंपास केली.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शिरसोली येथे माहेरी श्राध्दाचा कार्यक्रम आटोपून जळगावी घराकडे निघालेल्या महिलेची २० हजार रुपयांची रोकड आणि २० हजार रुपये किमतीचे सोन्‍याचे झुमके ठेवलेली पर्स चालत्या रिक्षातून चोरट्याने लंपास केली. एमआयडीसी पोलिसात याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. रेणुका नगर येथे नयना चौधरी या पती सचिन व मुलगी चिन्मईसोबत वास्तव्यास आहेत. गुरुवारी (ता.१९) नयना यांच्या माहेरी शिरसोली येथे (आईच्या घरी) श्राध्दाचा कार्यक्रम होता. (stole forty thousand worth of jewelry and cash on women purse )

त्यामुळे सकाळी १० वाजता त्या मुलीला घेऊन आईकडे गेल्या होत्या. तेव्हा त्यांच्या आईने सोने घेण्यासाठी २० हजार रुपयांची रोकड दिली. ती रोकड त्यांनी ५ ग्रॅमचे सोन्याचे झुमके ठेवलेल्या पर्समध्ये ठेवले. सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास त्या बी. जे. मार्केटकडे जाण्यासाठी एका रिक्षात बसल्या. रिक्षात आधीच दोन महिलांसह एक पुरुष प्रवासी होता. ईच्छादेवीपर्यंत नयना यांची पर्स त्यांच्याजवळच होती.

जिल्हा रुग्णालयाजवळ रिक्षातील एक पुरुष व एक महिला उतरल्यानंतर रिक्षा बी. जे. मार्केटजवळ थांबल्यावर नयना यांनी रिक्षाभाडे देण्यासाठी पर्स पाहिली असता ती चोरीला गेल्याची दिसून आले. आजू-बाजूला शोधूनही मिळून न आल्यामुळे रिक्षात सहप्रवाशाने ती चोरल्याची खात्री नयना यांना झाली. अखेर शुक्रवारी (ता.२०) एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून गुन्ह्याची नोंद केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT