Jalgaon News : शहरातील इंद्रनील सोसायटीतील कुटुंब गावी जाण्यासाठी रेल्वेस्थानकावर आले. लिफ्टमध्ये चढताना त्यांच्याजवळील दागिने व रोकड असलेली बॅग ते बाहेरच विसरले. फलाटावर पोचल्यावर बॅग विसरल्याचे लक्षात येताच त्यांनी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत बॅग लंपास झाली होती. नेत्रम कक्षाच्या माध्यमातून पोलिसांनी अवघ्या काही तासांत मोहाडी गावातून बॅग शोधली आणि पोलिस अधीक्षकांच्या हस्ते बॅग मुळ मालकाला परत देण्यात आली. ( Stolen bag found in Mohadi by old age women )
वर्षा बडगुजर मंगळवारी (ता. १४) दुपारी परिवारासह बऱ्हाणपूरला जाण्यासाठी जळगाव रेल्वेस्थानकावर आल्या. लिफ्टमध्ये चढताना त्या बॅग बाहेरच विसरल्या. मोबाईलवर बोलत त्या मुलासह फलाटावर पोचल्यावर बॅगची आठवण झाली. मात्र, बॅग लिफ्टबाहेरून गहाळ झाली होती. बॅगेत सोन्याचा हार, चांदीचे दागिने असल्याने बडगुजर कुटुंबियांची त्रेधा उडाली. शोध घेऊनही बॅग न मिळाल्याने त्यांनी रेल्वे पोलिसांत तक्रार नोंदविली व शहर पोलिसांना माहिती दिली.
शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल भवारी, कर्मचारी रतन गिते यांच्यासह गुन्हेशोध पथकाने रेल्वेस्थानक गाठले. तेथील सीसीटीव्ही कॅमेरे पाहिल्यावर वयस्कर महिला बॅग घेऊन जाताना सीसीटीव्हीत कैद झाली होती. पोलिसांनी नेत्रम कक्षातील कॅमेरे धुंडाळल्यावर पोलिस कर्मचारी मुबारक देशमुख यांनी रेल्वेस्थानकाहून वृद्धा रिक्षाने बसली आणि टॉवर चौकात उतरली.
पुन्हा तेथून रिक्षाने प्रवास करीत मोहाडीत उतरल्याचे शेाधून काढले. शहर पोलिसांनी तत्काळ त्या रिक्षाचा शोध घेत महिलेची ओळख पटवली. शहर पोलिसांनी मोहाडीतून त्या वृद्धेकडून दागिन्याची बॅग ताब्यात घेतली. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते बॅग आणि दागिने बडगुजर कुटुंबीयांना देण्यात आले. कुटुंबाने पोलिस दलाचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.