Officers and staff of forest department with suspect in tiger skin smuggling case. esakal
जळगाव

Jalgaon Crime News : पट्टेदार वाघाची शिकार करून कातडीची तस्करी; नशिराबाद टोल नाक्यावर कातडीसह 6 संशयितांना अटक

Crime News : वाघाची शिकार कोठे झाली, याबाबत अद्याप अस्पष्टता असून, संशयितांकडून वाघाची शिकार कुठे झाली आणि वाघाची कातडी कोणाला विकली जाणार होती, याचा तपास सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : मध्य प्रदेशाच्या हद्दीतील जंगलात वाघाची शिकार करून कातडी विक्रीच्या उद्देशाने घेऊन येणाऱ्या ६ संशयितांना नशिराबाद टोल नाक्यावर पुणे व जळगाव कस्टम अधिकाऱ्यांच्या पथकाने सापळा रचून अटक केली. संशयितांकडून वाघाची कातडी आणि इतर साहित्य जप्त केले आहे. (Jalgaon 6 suspects arrested with tiger skins at Nashirabad)

नशिराबाद टोल नाका येथे वाघाच्या कातडीची तस्करी होणार असल्याची माहिती पुणे व जळगाव कस्टम अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी वाघाच्या कातडीसह अजवर सुजात भोसले (वय ३५, रा. हलखेडा, ता. मुक्ताईनगर, ह.मु.चांगदेव), मोहमंद अतहर खान (वय ५८, रा. भोपाळ), नदीम गयासुद्दीन शेख (वय २६, रा. अहमदनगर), कंगनाबाई अजवर भोसले (वय ३०) तेवाबाई रहीम पवार (वय ३५) व रहीम रफीक पवार (वय ४०, तिघे रा. हलखेडा, ता. मुक्ताईनगर) यांना अटक केली. पथकाने संशयितांकडून ५ मोबाईल, २ दुचाकी व इतर साहित्य पुणे विभागाचे कस्टम अधिकारी रविरंजन व त्यांचे सहकारी, जळगाव कस्टम अधिकारी श्‍याम कोटावळे यांनी जप्त केले.

वाघाच्या शिकारीचा शोध

वाघाची शिकार कोठे झाली, याबाबत अद्याप अस्पष्टता असून, संशयितांकडून वाघाची शिकार कुठे झाली आणि वाघाची कातडी कोणाला विकली जाणार होती, याचा तपास सुरू आहे. सत्यता तपासण्यासाठी त्वचेचे नमुने हैद्राबाद येथील शासकीय प्रयोगशाळेत पाठविले आहेत. प्राथमिक माहितीच्या आधारे वाघाची मध्य प्रदेशात शिकार केल्याचा अंदाज आहे. तपासाबाबत जळगावचेह उपवन सरंक्षक प्रवीण ए. मध्यप्रदेश वन विभाग आणि सीमाशुल्क विभागाच्या संपर्कात आहेत. (latest marathi news)

जळगाव-पुणे विभागाची कारवाई

सर्व संशयितांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम-१९७२ अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून, कातडी वन्यजीव संरक्षण अधिनियम-१९७२ च्या सूची-१ मध्ये येत असून, हे कृत्य दंडनीय अपराध आहे. हा वन गुन्हा दखलपात्र व अजामिनपात्र आहे. गुन्ह्याची पुढील चौकशी जळगावचे सहाय्यक वनसंरक्षक उ. म. बिराजदार व जळगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन अशोकराव बोरकर करीत आहेत. विवेक देसाई यांच्या उपस्थितीत संपूर्ण कारवाई करण्यात आली.

नागरिकांना आवाहन

नागरिकांनी अवैध वन्यप्राणी ताब्यात ठेवू नयेत, तसेच त्यांची खरेदी अथवा विक्री करू नये, असे बेकायदेशीर कृत्य आढळल्यास टोल फ्री क्रमांक १९२६ वर संपर्क करावा, असे आवाहन जळगाव वन विभागाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT