Student search campaign esakal
जळगाव

Jalgaon News : खासगी मराठी शाळांची विद्यार्थी शोधमोहीम! शिक्षकांची घरोघरी भटकंती

किशोर पाटील

Jalgaon News : इंग्रजी शाळांच्या वाढत्या गर्दीत मराठी शाळा झाकून गेल्या आहेत. पालकांचा ओढा इंग्रजी शाळांकडे असल्याने मराठी शाळांना जणू घरघर लागली आहे. या स्पर्धेत जिल्हा परिषद, नगर परिषद व महापालिकेच्या शाळांसोबतच खासगी मराठी माध्यमांच्या शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. अशा प्रसंगी शिक्षक स्वत:ची नोकरी टिकविण्यासाठी विद्यार्थी शोधमोहिमेवर निघाले आहेत. (Student search campaign of private Marathi school by teacher )

पालकांना स्कूल बॅग, पुस्तके, गणवेश, बूट तथा विविध प्रकारची आमिषे दाखवून त्यांच्या पाल्यांना शाळांमध्ये प्रवेश दिले जात आहे. विद्यार्थी व पालकांचा कल इंग्रजी माध्यमांच्या शाळांसोबतच कॉन्व्हेंटकडे मोठ्या प्रमाणात आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळामध्ये चांगले शिक्षण मिळते, असा समज पालकांचा झाला आहे. आपल्या पाल्याला चांगले शिक्षण मिळावे, अशी सर्वच पालकांची इच्छा असते.

यासाठी चांगल्या इंग्रजी माध्यमांच्या प्रवेश मिळावा म्हणून पालकांची धडपड आणि संघर्ष सुरू असतो. दुसरीकडे, जिल्हा परिषद, नगर परिषद व महापालिकेच्या शाळांसोबत खासगी मराठी माध्यमांच्या शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. यामुळे शिक्षकांच्या नोकरीवरही गदा आली आहे. तुम्हाला नोकरी टिकवायची असेल तर विद्यार्थी शोधा आणि त्यांना आपल्या शाळांमध्ये प्रवेश घ्यायला लावा, अशी आदेशवजा सूचना या शाळांच्या प्रशासनाकडून शिक्षकांना दरवर्षी केली जाते.

त्यामुळे बहुसंख्य शाळांमधील शिक्षक सकाळी व सायंकाळी शहर व ग्रामीण भागातील वस्त्यांमध्ये, दुर्गम भागात पाड्या -पाड्यावर विद्यार्थी शोधताना दिसून येत आहे. जिथे चौथ्या वर्गापर्यंत शालेय शिक्षण आहे, तिथे पाचव्या वर्गात प्रवेशासाठी शिक्षक सकाळीच विद्यार्थ्यांचा जन्माचा दाखला व गुणपत्रिका घेण्यासाठी पोहचत आहेत. (latest marathi news)

आमची शाळा उत्तम आहे हे पटवून देतानाच विविध सोयीसवलती तथा पालकांना इतरही अनेक प्रकारची आमिषे दाखवली जात आहेत. विद्यार्थ्यांना शालेय बॅग, पुस्तके, गणवेश, बूट, वॉटरबॅग, कंपास तथा हॉस्टेलची मिळेल, असे आश्वासन शिक्षकांकडून पालकांना दिले जात आहे. ग्रामीण भागातून शहरात विद्यार्थी येत असेल तर त्याला बससेवा उपलब्ध करून दिली जात आहे.

या सोबतच काही संस्थांनी तर विद्यार्थ्यांचा एक वर्षाचा संपूर्ण शैक्षणिक खर्च उचलण्याची तयारीही दाखवली आहे. शिक्षक दरमहा स्वतः चा खिशातून पदरमोड करून विद्यार्थी शोधमोहिमेवर खर्च केला जातो. विद्यार्थ्यांना घरून शाळेपर्यंत आणण्यासाठी ऑटोची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जात आहे.

स्वखर्चातून पाचव्या वर्गात प्रवेश

जिल्हा परिषद, नगर परिषद व महापालिकेतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. वर्गातील पटसंख्या व नोकरी टिकवून ठेवायची असेल तर शिक्षकांना विद्यार्थी शोधून आणणे आवश्यक ठरते आहे. काही शिक्षक थेट संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांचे जन्मदाखले व गुणपत्रिका मिळवून स्वत:च्या खर्चाने विद्यार्थ्यांना पाचव्या वर्गात प्रवेश देत आहेत. काही इंग्रजी माध्यमांच्या शिक्षकांनादेखील विद्यार्थी शोधमोहीम राबवावी लागत आहे. एकूणच काय तर निवडणूकीचे कामे व इतर कामे करून शिक्षक सध्या विद्यार्थ्यांचा शोध घेतानाचे चित्र येथे बघायला मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

Salman khan Whatsapp Threat: "...तर सिद्दीकींपेक्षा वाईट हाल करू," सलमान खानला पुन्हा धमकी; व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमध्ये नक्की काय आहे?

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण : शिल्पकारानंतर पुतळ्याचे वेल्डिंगचे काम करणाऱ्या UP च्या वेल्डरला अटक

ISSF World Cup 2024: विवानला रौप्य, तर अनंतजीतला ब्राँझ; भारत चार पदकांसह नवव्या स्थानी

SCROLL FOR NEXT