Jalgaon Tourism : गिरीश महाजनांच्या रुपात स्थानिक मंत्र्यांकडे पर्यटन विकासाचे खाते असल्याचा लाभ जळगाव जिल्ह्याला गेल्या दोन वर्षांत झालेला दिसतो. गत दहा वर्षांच्या तुलनेत जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत पर्यटन विकासाच्या निधीत घसघशीत दुप्पट वाढ झाल्याचे दिसून येते. तर गेल्या आर्थिक वर्षांत जिल्ह्याला या कार्यक्रमांतर्गत अडीचशे कोटींच्या रकमेस प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे आकडेवारी सांगते. अर्थात त्यापैकी गेल्या आर्थिक वर्षात सर्वाधिक ६८ कोटी १८ लाखांचा निधी प्राप्त होऊन पैकी ५८ कोटी १८ लाखांचा निधी वितरितही झाल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. (Substantial increase in funds during year under Tourism Development)
केंद्रात २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यातही भाजपचे सरकार स्थापन झाले. या दोन्ही सरकारांनी देशात व राज्यात पर्यटन विकासावर भर दिल्याचे दिसून येते. गेल्या दहा वर्षांपूर्वी व त्यानंतरची आकडेवारी पाहिली असता, हा फरक स्पष्टपणे आढळून येतो.
जळगाव जिल्ह्याचा विचार करता २०१४ च्या आधी कोणत्याही एका वर्षात जळगाव जिल्ह्याला पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत ८ ते १० कोटींपेक्षा अधिक निधी मिळाला नाही. २०१४ नंतर सातत्याने या निधीत वाढ होत गेली. गेल्या दोन वर्षांत तर मंजूर कामांसह प्रशासकीय मान्यता मिळालेली रक्कम, प्राप्त निधीत भरीव वाढ झाल्याचे दिसून येते.
तरीही ११ कोटींचा निधी शिल्लक
सन २०२३-२४ मध्ये जळगाव जिल्ह्यात पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत १७७ कामे मंजूर झाली. प्रशासकीय मान्यतेची रक्कम तब्बल २५० कोटी ९३ लाख होती, प्राप्त निधी ६८ कोटी १८ लाख तर वितरित निधीची रक्कम ५८ कोटी १८ लाख ५७ हजार होती. ऑगस्ट २०२४ अखेर या घटकांतर्गत शिल्लक नधी ११ कोटी ४६ लाख ८३ हजार एवढा आहे.
या क्षेत्रांच्या विकासावर भर
गेल्या काही वर्षांत जळगाव जिल्ह्यात विविध तालुक्यांमधील स्थळांना तीर्थक्षेत्र विकास व पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत चांगला निधी मंजूर होऊन या स्थळांचा विकास केल्याचे प्रयत्न शासनाकडून सुरू आहेत.
यात प्रामुख्याने जामनेर तालुक्यात गारखेडा येथे वाघूर धरणाच्या बॅकवॉटर परिसरात नव्यानेच विकसित करण्यात आलेले निसर्गरम्य पर्यटन केंद्र, मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील संत मुक्ताई मंदिर परिसर, हरताळा येथील श्रावण बाळाचे मंदिर व तलाव, तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमात श्रीक्षेत्र पद्मालयला ‘ब’ दर्जा देण्यासह विशेष निधी मंजूर करण्यात आला. तर मनुदेवी, पाटणादेवी, महर्षी व्यास मंदिर, जामनेर तालुक्यातील सोमेश्वर महादेव मंदिरांचाही त्यात समावेश होतो. (latest marathi news)
गारखेडा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
जामनेर तालुक्यातील गारखेडा येथे पर्यटन विकास मंत्रालयाने गेल्या काही वर्षांत भरीव निधी उपलब्ध करून देत याठिकाणी वाघूर धरणाच्या ‘बॅकवॉटर’मध्ये बेट विकसित केले आहे. बांबू हटस्, क्रूझ सफारी, क्रूझ रेस्टॉरंटसह अन्य वैशिष्ट्यपूर्ण सुविधा या स्थळावर पुरविण्यात आल्या आहेत. जळगाव शहरापासून अवघ्या २८ ते ३० किलोमीटर अंतरावर हे रम्य स्थळ असून, केरळच्या धर्तीवर या बेटाचा विकास करण्यात आला आहे. या प्रकल्पावर जवळपास दोनशे कोटींहून अधिक खर्च करण्यात आल्याचे सांगितले जातेय.
गेल्या पाच वर्षांतील निधीची आकडेवारी (आकडे लाखांत)
वर्ष-------- मंजूर कामे---- प्र.मा. रक्कम------ प्राप्त निधी---- वितरित निधी
२०१८-१९--- १३---------४२०२.३१------- ३७६८.८१----३७६८.८१
२०१९-२०----७----------९५७.४७--------६९८.९४-------६९८.९४
२०२०-२१----१४---------५४२७.७९-------४२६८.१०-----४२०३.९६
२०२१-२२----२४---------२९४९.५३------१५५७.९५-----१४२१.९६२
२०२२-२३----१७७-------२५०९३.२७-----६८१८.४५------५८१८.९९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.