parikshit Gulab Saner esakal
जळगाव

Success Story : शेतकरी पुत्र परीक्षित सनेर झाला फौजदार

Success Story : हातेड (ता. चोपडा) येथील शेतकरी पुत्र परीक्षित गुलाब सनेर याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत चौथ्या प्रयत्नात फौजदार बनण्याचे स्वप्न पूर्ण केले.

उमेश काटे

Success Story : हातेड (ता. चोपडा) येथील शेतकरी पुत्र परीक्षित गुलाब सनेर याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत चौथ्या प्रयत्नात फौजदार बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. सुट्टीत वडिलांसोबत शेती करीतच त्याने हे यश संपादन केले. जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या बळावर आपण अशक्य गोष्टही शक्य करू शकतो, हे त्याने आपल्या कार्यकर्तृत्वातून दाखवून दिले. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी तो रोल मॉडेल ठरला. ()

परीक्षितचं दहावीपर्यंतचं शिक्षण हातेडला झालं. चोपडा येथील एम. जी. महाविद्यालयातून ऑरगॅनिक केमस्ट्री या विषयात एमएसस्सीचे शिक्षण पूर्ण केले. पदवीनंतर २०१७मध्ये त्याने स्पर्धा परीक्षची तयारी सुरू केली. कोविडच्या काळात दोन वर्षे वाया गेले. मात्र, सेल्फ स्टडी, मेहनत व जिद्दीच्या बळावर त्याने हे यश संपादन केले.

घरची परिस्थिती बेताची असताना वडील गुलाब सनेर व आई कल्पना यांनी दोन एकर शेतातून रक्ताचे पाणी करीत दोन्ही मुलांना उच्चशिक्षण दिले. परीक्षितने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा अनेकदा गावी जाऊन अनेकदा वडिलांसोबत शेतात काम केले. शेती काम करीतच अभ्यास सुरू ठेवला मात्र, जिद्द सोडली नाही. (latest marathi news)

त्यामुळे आता पोलिस उपनिरीक्षकपदावर काम करण्याची संधी मिळाली. बारावीला केवळ ४८ टक्के होते. मात्र, खचून न जाता पीएसआय होण्याचे स्वप्न पूर्ण केले. पुणे येथील एक वर्षवगळता त्याने स्वबळावर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला. कष्ट, मेहनत व जिद्दीने पीएसआयपदापर्यंत मजल मारली.

भाऊ असावा तर असा!

परीक्षितचा लहान भाऊ निखिलने बीईचे शिक्षण पूर्ण केले. त्यालाही ‘यूपीएससी’ची परीक्षा देऊन उच्चअधिकारी व्हायचे होते. मात्र, मोठ्या भावाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने स्वतःच्या स्वप्नावर पाणी सोडले. लहान भावाची समर्पणाची ही वृत्ती इतरांसाठी प्रेरणादायी आहे. त्याने खासगी नोकरी करून भावासाठी पैसा उपलब्ध करून दिला. त्याच्या या सहकार्यामुळेच ‘पीएसआय’च्या मुलाखतीत राज्यात दुसरा येण्याचा बहुमान मिळाला. परीक्षेतने आपल्या यशाचे श्रेय आईवडील व लहान भावाला दिले. परिक्षतसह त्याच्या कुटुंबीयांचेही सर्वत्र कौतुक होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT