Warkari waiting for Pandharpur bus at the bus stand  esakal
जळगाव

Jalgaon News: वारकऱ्यांच्या मदतीला धावली मुक्ताईची लेक! रोहिणी खडसेंच्या प्रयत्नांना यश; रद्द बस अखेर पंढरपूरला रवाना

Jalgaon News : ज्यांना पालखी सोहळ्यासोबत पायी वारी करणे शक्य नाही, असे वारकरी राज्य परिवहन महामंडळाच्या बसद्वारे आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला नित्यनेमाने जातात.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : आदिशक्ती संत मुक्ताईच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मुक्ताईनगरातून आषाढी एकदशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी निघणारी बस ऐनवेळी रद्द झाल्याने वारकऱ्यांचा हिरमोड झाला. पंढरीची आस घेऊन वाट बघणाऱ्या वारकऱ्यांच्या मदतीला अशा वेळी रोहिणी खडसे धावून आल्या आणि त्यांच्या प्रयत्नांनी ही रद्द झालेली बस पंढरपूरकडे रवाना करण्यात आली. (Rohini Khadse efforts canceled bus finally left for Pandharpur)

मुक्ताईनगर तालुका व परिसरात वैष्णव, वारकरी संप्रदायाचे पाईक असणाऱ्या वारकऱ्यांची संख्या मोठी आहे. वारकरी दरवर्षी आदिशक्ती संत मुक्ताईच्या पालखी सोहळ्यासोबत पायी वारीने आषाढी एकादशीला वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला पंढरपूर येथे जातात. ज्यांना पालखी सोहळ्यासोबत पायी वारी करणे शक्य नाही, असे वारकरी राज्य परिवहन महामंडळाच्या बसद्वारे आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला नित्यनेमाने जातात.

ऐन वेळी बस रद्द

राज्य परिवहन महामंडळातर्फे मुक्ताईनगर ते पंढरपूर बस नियमित सोडण्यात येतात. बुधवारी (ता. १०) वारकरी, भाविक पंढरपूर जाण्यासाठी मुक्ताईनगर बसस्थानकावर जमले होते. मात्र, ऐनवेळी बस उपलब्ध नसल्याचे कारण सांगून मुक्ताईनगर ते पंढरपूर बस रद्द झाल्याचे राज्य परिवहन महामंडळातर्फे सांगण्यात आले. त्यामुळे पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाण्याची ओढ लागलेल्या वारकऱ्यांचा हिरमोड झाला. त्यांनी रोहिणी खडसे यांच्याशी संपर्क करून हा प्रकार सांगितला. (latest marathi news)

रोहिणी खडसेंचा पुढाकार

रोहिणी खडसे पक्षाच्या कामानिमित्त मुंबईमध्ये होत्या. त्यांनी वारकरी बांधवांची अडचण जाणून घेतली व राज्य परिवहन महामंडळाच्या प्रशासनाशी मोबाईलवरून संपर्क साधून वारकरी बांधवाना पंढरपूर जाण्यासाठी तत्काळ बस उपलब्ध करून देण्याविषयी सूचना केली. त्यावर अर्ध्या तासात पंढरपूर जाण्यासाठी बस उपलब्ध करून देण्यात आली.

...अन्‌ मुक्ताईचा जयघोष

त्यानंतर आदिशक्ती मुक्ताई आणि पांडुरंगाच्या नावाचा जयघोष करत वारकऱ्यांना घेऊन बसने पंढरपूरकडे प्रस्थान केले. यावर सर्व वारकरी बांधवांनी रोहिणी खडसे यांचे आभार व्यक्त करत, पंढरपूरला विठ्ठल दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या मदतीला मुक्ताईची लेक धावून आल्याची भावना व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्रच नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

SCROLL FOR NEXT