fungal infection esakal
जळगाव

Jalgaon Summer Disease: अतिउन्हामुळे ‘फंगल इनफेक्शन’च्या रुग्णांत वाढ! GMCत रोज येताहेत 30 रुग्ण; वर्षभरात 9 हजारांवर रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Summer Disease : सध्या अतिउष्ण उन्हाळा सुरू आहे. उष्णतेमुळे घाम अंगावर साचून राहतो. यामुळे ‘फंगल’ इनफेक्शन अंगावर कोठेही होते. सतत खाज सुटून जीव असह्य होतो. जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात फंगल इन्फेक्शनची रोज ३० रुग्ण उपचारासाठी येत असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील त्वचारोग तज्ज्ञ डॉ. प्रज्ञा प्रताप जाधव यांनी दिली. वर्षभरात नऊ हजारांपेक्षा अधिक रुग्ण या विकाराचे येतात. (Jalgaon Summer Disease Increase in fungal infection patients)

कारणे, प्रकार, प्रतिबंध, उपचार

फंगल इन्फेकशन बुरशीजन्य संसर्ग आहे. जो संपूर्ण जगात आढळून येतो. एखादी बाह्य बुरशी शरीरातील एक विशिष्ट भागावर जमा होते. शरीराची रोग प्रतिकार शक्ती त्याच्याशी सामना करण्यास सक्षम नसते. तेव्हा ही समस्या उदभवते. फंगस कुठेही असू शकते.

म्हणजे हवा, माती, पाणी झाडांमध्ये काही फंगस असतात. सामान्यपणे मानवी शरीरातही वास्तव करतात. इतर सुक्ष्मजंतूप्रमाणे त्यातील काही आपल्यासाठी चांगले असतात, तर काही वाईट असतात. हानिकारक फंगस आपल्या शरीरावर हल्ला करतात, तेव्हा त्यांना संपवणे आपल्यासाठी खूप कठीण असते.

लक्षणे अशी : त्वचेत बदल होणे, त्वचा लालसर होणे, खाज सुटणे, पायात रिंग वर्म, जांघामध्ये खाज सुटणे. पायाच्या रिंगवर्मच्या समस्येला ‘एथलीट फूट’ किंवा ‘टिनिया बेडीस’, असे म्हटले जाते. हे सामान्य प्रकारचे फंगल इन्फेकशन आहे. ज्याचा पायावर परिणाम होतो.

एथलीट फुटची समस्या सामान्यपणे ज्यांना अधिक प्रमाणात घाम येतो. क्रीडाक्षेत्राशी निगडित असणारे लोक, दिवसभर बूट घालणारे, उबदार आणि ओलसर वातावरणात एथलीट फुटची बुरशी वाढते. उन्हाळ्यात अनेकांचा याची लागण होते. जीवाणू उष्ण वातावरणात वेगाने वाढतात. त्वचेवर परिणाम करणाऱ्या प्रत्येक फंगस त्वचेवरील प्रभावाचा वेगळा प्रकार असू शकतो.

उपचार : औषधी व टापिकल क्रिम असते. यासोबत काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. पायांना हवा लागू देणे, कोरडे ठेवणे, स्वच्छतेची काळजी घेणे. काही दिवस सॅंडल घालणे. (latest marathi news)

जांघांमध्ये खाज सुटणे

जांघांमध्ये खास सुटणाऱ्या समस्सयेला टिनिया क्रूरिस, असे म्हटले जाते. हा फंगल इन्फेकशनचा एक अत्यंत सामान्य प्रकार आहे. या फंगसला ओलसर आणी उबदार वातावरणात राहणे पसंत असते.

"बहुतांश फंगल इन्फेक्शन मेडिकलमध्ये मिळणाऱ्या औषध किंवा क्रिमच्या वापरामुळे बरे होऊ शकतात. मात्र, गंभीर फंगल इन्फेक्शन असेल तर डॉक्टरांचा सल्ला गरजेचा आहे. सुरक्षात्मक उपयांचा अवलंब करूनही फंगल इन्फेक्शनपासून बचाव करता येऊ शकतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार केल्यास फंगल इन्फेक्शन रोखता येऊ शकते."

-डॉ. प्रज्ञा प्रताप जाधव, त्वचारोग तज्ज्ञ, जीएमसी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Sexual Assault Case: पुणे पुन्हा हादरले! घरात घुसून नराधमाने केला महिलेवर अत्याचार

Tirupati Balaji Prasad Video: तिरुपती बालाजीच्या प्रसादात आता आढळले किडे, पाहा धक्कादायक व्हिडिओ

Whatsapp Username Feature : मोबाईल नंबर नसतानाही व्हॉट्सॲपवर करता येणार चॅटिंग; काय आहे युजरनेमचं भन्नाट फीचर?

Mumbai Local: नवीन वेळा पत्रामुळे रेल्वे प्रवाशांची दाणादाण!

Bigg Boss Marathi 5 : "हा अन्याय आहे..." व्होटिंग ट्रेंडमध्ये धक्कादायक बदल ; प्रेक्षकांचा मेकर्सवर घणाघाती आरोप

SCROLL FOR NEXT