summer heat esakal
जळगाव

Jalgaon Summer Heat : मतदान केंद्रावर मिळणार ‘ग्लुकोज-डी, ओआरएस, बीपी, शुगर’ची गोळी; मतदारांनो, बिनधास्त पडा घराबाहेर

देविदास वाणी ः सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Summer Heat : जिल्ह्यात ‘मे हीट’चा तडाखा सुरू झाला आहे. तापमानाने ४२ अंशाचा टप्पा गाठला आहे. १३ मेस जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यादिवशी तापमान राहिलच. मात्र, मतदारांनी काळजी करण्याचे कारण नाही. कारण जिल्हा आरोग्य विभागाने मतदान केंद्रावर ग्लुकोज डी, ओआरएससह बीपी, शुगर व इतर औषधी देण्याची व्यवस्था केली आहे. आरोग्य विभागाने यासंदर्भात नियोजन केले असून, डॉक्टरांपासून ते आशाताईंपर्यंतचे सर्वच कर्मचारी मतदारांची काळजी घेणार आहेत. (Health department has planned for voters on election day )

जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी ३८ लाख १५ हजार ७९६ मतदार आहेत. जळगाव लोकसभेसाठी १९ लाख ९४ हजार ४६, तर रावेर लोकसभेसाठी १८ लाख २१ हजार ७५० मतदार आहेत. सध्या उन्हाचे चटके बसत असल्याने मतदार मतदानासाठी किती बाहेर पडतील, असा प्रश्न आहे. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी प्रशासनाकडून पूर्ण प्रयत्न केले जात आहेत. गाव, शहरांमध्ये जनजागृतीही केली जात आहे.

देशात पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात बहुतांश लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरल्याचे समोर आले आहे. यासाठी काळजी घेतली जात आहे. केंद्रावरच औषधी, ओआरएस दिले जाणार आहे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे मतदारांनी कसलीही भीती न बाळगता मतदानासाठी बाहेर पडावे, असे आवाहन आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने केले आहे.

''मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांना उन्हाचा काही त्रास जाणवला, तर आमच्याकडून ओआरएस, ग्लुकोज डी यासोबतच काही औषधी दिली जाणार आहेत. त्याचे नियोजन केले असून, संबंधित तालुका व वैद्यकीय अधिकाऱ्यांना बैठक घेऊन सूचना केल्या जातील. मतदारांनी न घाबरता केंद्रावर येऊन आपला हक्क बजवावा.''-डॉ. सचिन भायेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी

मतदान केंद्रांवर यांची असणार नियुक्ती

जिल्ह्यात तीन हजार ८८६ मतदान केंद्रे आहेत. प्रत्येक मतदान केंद्रांवर आशाताई, अंगणवाडीसेविका, गटप्रवर्तक यांची नियुक्ती होणार आहे. त्यांना सहकार्य व्हावे, यासाठी आरोग्यसेवक, समुदाय आरोग्याधिकारी, परिचारिका आदी असणार आहेत. या सर्वांवर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्याधिकारी नजर ठेवणार आहेत. आरोग्य विभागाने शोधून काढलेले रुग्ण, त्यांच्यासाठी मतदान केंद्रावर विविध सुविधा असणार आहेत.

आकडे बोलतात...

*गरोदर माता : ५३ हजार ८५७

*रक्तदाब, शुगरचे रुग्ण : १ लाख ९३ हजार २७२

*क्षय रुग्ण : २,३६६

*स्तनदा माता : २ लाख २९ हजार ८४०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT