As the government officials and employees are busy with election work, the office is crowded and in the second photo, the streets of the city are deserted due to the intense heat of the sun. esakal
जळगाव

Jalgaon Summer Heat : अमळनेरमधील रस्ते उन्हाच्या तीव्रतेमुळे निर्मनुष्य; ‘मे हिट’चा परिणाम

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Summer Heat : तालुक्यातील शासकीय कार्यालयांमधील अधिकारी व कर्मचारी लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे विविध कार्यालयांमध्ये दिवसभर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. सोबतच उन्हाच्या तीव्रतेमुळे सकाळी ११ वाजेनंतरच शहरामधील रस्ते आता निर्मनुष्य व्हायला लागलेले दिसून येत आहेत. (Roads in Amalner are barren due to intense heat )

मे महिन्याच्या सुरवातीलाच तापमानाने ४२°-४३°चा टप्पा ओलांडला असून, उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सकाळी ८ ते ११ वाजेच्या आतच नागरिक आपल्या कामांना प्राध्यान देत आहेत. सकाळी अकरा वाजेनंतर शहरातील बाजरपेठ, शासकीय कार्यालये, बँका यामध्ये तुरळक गर्दी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली दिसून येत आहे.

त्यातच शासकीय कार्यालयांमधील बहुतांश अधिकारी व कर्मचारी हे लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त झालेले आहेत. त्यामुळे शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये सध्या शुकशुकाट पाहायला मिळत आहे. म्हणून ग्रामीण भागातून आपल्या विविध कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी येेणाऱ्या गावाकडील ग्रामस्थांचीही गर्दी सध्या पाहावयास मिळत नाहीये.

पाणपोईंची संख्या घटली

ऐन उन्हाळ्यात अमळनेर शहरामधील पाणपोईंची संख्या कमी झालेली दिसून येत आहे. विशेष म्हणजे शहरातील काही भागात उभारण्यात आलेल्या पाणपोईतदेखील दुपारी दोन वाजेनंतर ठणठणाट पाहायला मिळत आहे. त्यामुळे गावखेड्यांवरून शहरात विविध कामांसाठी दाखल झालेल्या नागरिकांचे मात्र, पिण्याच्या पाण्याअभावी हाल होताना दिसून येत आहेत.

अमळनेर बसस्थानकात असलेल्या पाणपोईतदेखील पाणीच उपलब्ध नसल्याने ठिकठिकाणांहून दाखल झालेल्या प्रवाशांचे पाण्याअभावी हाल होत आहेत. मे महिन्यात दोन तारखेनंतर लग्नकार्यासाठी मुहूर्त नसल्याने बसस्थानकावरील गर्दीचे प्रमाणदेखील कमी झालेले आहे.

काळजी घेण्याचे जनतेला आवाहन

गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे आतापर्यंत अनेकांना उन्हाचा त्रास झाल्याने रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याची वेळ आलेली आहे. म्हणून नागरिकांनी वाढते तापमान पाहता शक्यतो दुपारी घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोबतच जर का घराबाहेर पडणे आवश्‍यकच असेल तर डोक्याला रुमाल बांधून किंवा टोपीसह आवश्‍यक ती काळजी घेण्याचे आवाहनही आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT