Vadji (T. Bhadgaon) A world created by shepherds in the fields. esakal
जळगाव

Jalgaon Summer: जित्राबं जगविण्यासाठी मेंढपाळांचा संघर्ष! गिरणा पट्ट्यांत अनेक कळप दाखल; रणरणत्या उन्हात शेतातच उघड्यावर संसार

सुधाकर पाटील

भडगाव : सध्या सूर्य अक्षरशः आग ओकतोय. या अग्नीतांडवात घरातून बाहेर निघणेही मुश्किल झाले आहे. मात्र अशाही परिस्थितीत मेंढपाळ उन्हाची पर्वा न करता आपल्या जित्राबांसाठी शेतात उघड्यावर संसार थाटतांना दिसत आहेत. त्यांना बचावासाठी निसर्गाने वरदान दिले आहे की काय? असा प्रश्न त्यांच्याकडे पाहून पडल्याशिवाय राहत नाही. (Jalgaon Summer heat Shepherds Struggle to Live life)

नाशिक जिल्ह्यातून विषेशत: नांदगाव व मालेगाव तालुक्यातील मेंढपाळ हे पावसाळा संपल्याबरोबर दरवर्षी गिरणा पट्ट्याचा रस्ता धरतात. भडगाव, पाचोरा व चाळीसगाव तालुक्यात ते आपल्या कुटुंबासह आठ महिने स्थिरावतात. आज या शेतात तर उद्या दुसऱ्या शेतात, त्यांचे बिऱ्हाड हालत असते. त्यांच्याजवळ असलेल्या मेंढ्याना पाणी, चारा मिळण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. जेथे ही सोय उपलब्ध आहे तिकडे वाडा (मेंढ्याना कळप) बसवण्यावर त्यांचा भर असतो.

वर्षातील आठ महिने त्यांचा मुक्काम शेतातच असतो. पावसाळ्याचे चार महिने ते मेंढ्याना घेऊन आपल्या गावी जातात. तेही गावाकडे एखादं चांगला पाऊस बरसल्यावरच ते माघारी जायला निघतात. पावसाळ्यात गावाकडे मेंढ्यांना चाऱ्याची सोय होते. शिवाय शेतातही पेरणी करण्यास वेळ मिळतो. त्यामुळे ते चार महिने गावी जातात.

अंथरुण ठेवण्याची व्यवस्था

विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर असते, असे म्हटले जाते. त्याप्रमाणे यांचा संसार पाठीवरच असतो. घोड्याच्या पाठीवरून इकडे तिकडे फिरत असतो. अंथरूण ठेवण्यासाठी चार लाकडाचे पाय असलेला टेबल म्हणजे त्याचे घर असते. त्यांच्याकडे गॅस, आधुनिक चूलही नसते. तिने दगड ठेवले अन् काड्या पेटविल्या की स्वयंपाक केला जातो. लागेल तेवढेच साहित्य सोबतीला असते. एका घोड्याच्या पाठीवर सर्व साहित्य बसते. (latest marathi news)

...ही तर निसर्गाचीच देण

मेंढपाळ सूर्याची कोणतीही तमा न बाळगता आपला दिनक्रमात कुठलाही बदल करताना दिसत नाही. आज किती तापमान आहे? हे त्यांच्या गावीही नसते. आपल्या मेंढ्याना चारा व पाण्याचीच दिवसभर त्यांना चिंता असते. उष्णता किती आहे, याच त्यांना काहीएक देण- घेण नसते. पण तरीही त्यांच्यावर या तापमानाचा कुठलाही परिणाम होत नाही. त्यांना निसर्गाचीच देण आहे की काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.

शेतातच लागतात मुला-मुलींचे लग्न

मेंढपाळ दररोज ढेकळात झोपतो. त्याला त्याच्यातच व्यवस्थित झोप लागते. पण मऊ असलेल्या गादीत त्याला झोप येत नाही. आजच्या घडीला एकीकडे ऐषोआरामीची दिवसेंदिवस ‘क्रेझ’ वाढत आहे. मात्र, मेंढपाळ समाज आजही आहे तेथेच आणि आहे. त्यात समाधान मानताना दिसत आहे. आजही त्यांच्या मुला-मुलींचे लग्न शेतातच लागताना दिसतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT