As heat of sun starts to feel, citizen is coming out with a handkerchief on his head, Citizens enjoying juice in the summer  esakal
जळगाव

Jalgaon Summer Heat : तापमानाचा पारा दुसऱ्या दिवशीही 42 अंशावर!

Jalgaon Summer Heat : उन्हाच्या दाहकतेत शहर होळपळून निघत असून, नागरिक उन्हापासून सरंक्षण मिळण्यासाठी शितपेयांसह कुलर, ए.सी. बसणे पसंत करीत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Summer Heat : शहरासह जिल्ह्यात तापमान सलग दुसऱ्या दिवशी ४२.६ अंश नोंदविले गेले. उन्हाच्या दाहकतेत शहर होळपळून निघत असून, नागरिक उन्हापासून सरंक्षण मिळण्यासाठी शितपेयांसह कुलर, ए.सी. बसणे पसंत करीत आहे. तर ग्रामीण भागातील नागरिक दाट झाडांच्या सावलीत दुपारच्या वेळी बसलेले दिसतात. लोकसभा निवडणुकीचे वातावरण एकीकडे तापत असताना दुसरीकडे तापमानांचा उच्चांकही वाढत आहे. मार्चअखेरच तापमानाने उच्चांक गाठण्यास सुरवात केली आहे. (Jalgaon Summer Heat)

नागरिक उन्हापासून काही काळ का होईना मुक्तता मिळविण्यासाठी विविध प्रकारचे शीतपेये, उसाचा रस, फळांचा रस, बर्फाचा वापर करताना दिसतात. उन्हात पडताना डोक्याला रुमाल, डोळ्यांना गॉगल वापर करताना दिसतात. महिला छत्री किंवा सनकोटचा वापर करतात.

अनेकांनी बदविली दिनचर्या

दुपारी बारानंतर उन्हाची तीव्रता वाढते. ती सायंकाळी पाचपर्यंत कायम असते. यामुळे अनेकांनी दुपारनंतर उन्हात जावून कामे करण्याचे टाळले आहे. जी कामे आहेत ती दुपारी बाराच्या आत करून दुपारी कार्यालयात, दुकानात कुलरची हवा घेत व्यापारी बसलेले दिसतात.

दुपारी ग्राहक कमी

दुपारी उन्हाच्या तीव्रतेने ग्राहकांची वर्दळ कमी झालेली दिसते. सकाळी किंवा सायंकाळी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते. ग्राहक नसल्याने बाजारपेठेत दुपारी शुकशुकाट असतो. बाजारात अनेक ठिकाणी सननेट लावण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

वेलनेस फाउंडेशनने नोंदविलेले तापमान

तालुका तापमान (अंश सेल्सीअस)

जळगाव : ४२.८

भुसावळ : ४२.८

अमळनेर : ४२

बोदवड : ४२

भडगाव : ४२.५

चोपडा : ४१.६

चाळीसगाव : ४१

धरणगाव : ४२

एरंडोल : ४२

फैजपूर : ४२

जामनेर : ४२.८

मुक्ताईनगर : ४२.५

पारोळा : ४२.५

पाचोरा : ४२.५

रावेर : ४१.५

वरणगाव : ४२.८

यावल : ४१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT